गायकवाड कुटुंबीयांनी प्रभोधनात्मक पद्धतीने गौराई सण केला साजरा...


गायकवाड कुटुंबीयांनी प्रभोधनात्मक पद्धतीने गौराई सण केला साजरा...

 प्रतिनिधी : बारामती (काशिनाथ पिंगळे)

गौरी गणपती हा सण  महाराष्ट्रात दरवर्षी उत्साहात  सर्वजण साजरा करत असतात. त्याचप्रमाणे लाडक्या गौराईचे थाटात याहीवर्षी गौरीचे आगमन झाले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महिलांनी  हा सण केवळ कुटुंबीयांच्या व मोजक्या सवाष्णीच्या उपस्थित साजरा केला.

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात गौरी गणपतीचा सण हा धार्मिक रूढी परंपरेच्या अनुषंगाने साजरा करत असतात असे असतानाच सोमेश्वरनगर येथील सोनाली सतीश गायकवाड व सारिका आप्पासाहेब गायकवाड या कुटुंबीयांनी गौराई सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीत साजरा केला.

 गणपतीची स्थापना करत परिवारातील महिलांनी समाजात मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे असे असताना   गौराई रुपी मुलगी घरात आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असल्याने गौराई स्थापनेचा सण आम्ही   गेली चार वर्ष आनंदाने सण साजरा करतो.

      यावर्षी गायकवाड कुटुंबीयांनी दुचाकीवर दोन्ही गौराई स्थापन करून त्यांचे पूजन केले, त्याद्वारे प्रत्येक कुटुंबीयांनी सुरक्षित प्रवास करावा, गाडीचा वेग कमी ठेवावा व प्रवास करताना नियमांचे पालन करावे असे दुचाकीला फलक लावून येणाऱ्या महिला वर्गांना सूचित केले, त्याचप्रमाणे गौराईचे असणारे बाळ या बाळाला तोंडाला मास्क, हातावरती सँनीटायझर, शेजारी सतत हात धुण्यास लागणारे हॅन्ड वॉश अशी सजावट करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक संदेश ही दिला.

    या वस्तूंचे नियमित वापर करावेत, लहान मुलांपासून  मोठ्या नागरिकांनी याचे पालन करावे असाही संदेश या गौराई पूजनच्या वेळेस गायकवाड कुटुंबीयांनी देण्याचा प्रयत्न केला व गौराई हा सण सामाजिक दृष्ट्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर व कौटुंबिक सुरक्षिततेच्या दृष्टीने एक आगळ्यावेगळ्या पद्धतीत येणाऱ्या सुहासनी महिलांना संदेश देत साजरा केला. आणि अशा पद्धतीत साजरा केल्याने गायकवाड या कुटुंबियांचे सोमेश्वर नगर परिसरातून कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News