नेतृत्वाखाली नरसिंहपूर येथे घंटानाद आंदोलन -


नेतृत्वाखाली नरसिंहपूर येथे घंटानाद आंदोलन -

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी:

“दार उघड उद्धवा दार उघड “म्हणत इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नरसिंह पूर येथे केला घंटानाद…

राज्यभरातील मंदिरे सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था संघटना धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने यांना पाठिबा देत आज हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाने एकत्र येत आज इंदापूर तालुक्यातील नरसिंह पूर येथे घंटानाद आंदोलन केले.

राज्यातील ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी आज दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता राज्यभरात धार्मिक-आध्यात्मिक समन्वय आघाडीच्यावतीने इंदापूर मधील नरसिंह येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास भाजपच्यावतीने पाठिंबा देत आंदोलनास उपस्थित राहत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही पाठिंबा दिला.

इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष शरद जामदार,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सचिव तानाजीराव थोरात, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राम आसबे, अमोल इंगळे, माऊली वाघमोडे,प्रा रामहरी लोखंडे व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की हे सरकार कुंभकर्णा सारखे झोपले आहे, काही अटी व शर्ती घालून मंदिरे खुली करण्यात यावेत,जो नियम इतर ठिकाणी लागू केला तोच नियम मंदिरांसाठी लागू करावा, व महाराष्ट्रातील सर्व मंदिरे सुरु करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली.

यावेळी सोशल डिस्टिंग चे पालन करत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News