दारू दुकाने उघडण्यास परवानगी मिळते मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही -आ पाचपुते....भाजप चे घंटानाद आंदोलन ,


दारू दुकाने उघडण्यास परवानगी मिळते मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही -आ पाचपुते....भाजप चे घंटानाद आंदोलन ,

श्रीगोंदा प्रतिनिधी :- 

राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती पण धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का दिली  जात नाही असा सवाल आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित आंदोलनात केला. 

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकस आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा पुनश्च हरी ओम च्या नावाखाली सर्व काही चालू केले.मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरी ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. आणि भजन पूजन करणारे  भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत.भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा सरकारचा कारभार सुरु आहे, सरकारकडून दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी मिळते, मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही ! असा सवाल या घंटानाद आंदोलनावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी केला. 

आमदार पाचपुते पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे.केंद्र सरकारनेही ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरु झालेली आहेत.राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तातून होत आहे.मात्र  पुनश्च हरी ओम म्हणून हरीलाच बंदिस्त करून  सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. 

या आंदोलनाच्या निमित्ताने सामाजिक अंतर आणि नियमासह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन श्रीगोंदा तालुका भाजपाचे वतीने  आमदार बबनराव पाचपुते,जिल्हा चिटणीस सुनीलराव थोरात , भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, महिला अध्यक्षा सौ.सुहासिनी गांधी, दादाराम ढवाण,  भाजपा कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे,  भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष रायकर,शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, माजी सभापती शहाजी हिरवे, नगरसेवक शहाजी खेतमाळीस,संग्राम घोडके, सुनील वाळके, अंबादास औटी, महावीर पटवा, दिपक हिरनावळे, मंदाकिनी शेलार, नितीन नलगे,  दत्तात्रय जगताप संतोष धोत्रे मेजर ,बापूराव जाधव ,विजय वाकडे , अमोल अनभुले, विशाल राऊत, नमन भंडारी, कुंडलिक गाडे, भगवानराव वाळके, चंद्रकांत खेतमाळीस, महेश क्षीरसागर, उमेश बोरुडे, संतोष क्षीरसागर, रोहित गायकवाड, नवनाथ हिरवे, राजेंद्र मोटे, मुक्तार शेख, विनोद धामणे, विनोद होले, इ.पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  सामाजिक अंतर ठेऊन शनिमंदिर श्रीगोंदा येथील धार्मिक स्थळाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले.

*****

हे सरकार फक्त बदल्या व टेंडर कामात व्यस्त - आमदार पाचपुते 

तीनचाकी रिक्षा चालवणे जसे अवघड असते तसेच हे तीन पक्षाचे सरकार चालवणे आहे या सरकार मध्ये एकमेकांची मर्जी सांभाळण्यात वेळ जात आहे कोणत्या विभागाने बदली चा आदेश केला तर लगेच दुसऱ्या विभागाच्या मंत्र्याने खो घालण्याचे काम चालविले आहे या सरकार ला फक्त बदल्या व मोठ्या रकमेच्या टेंडर मध्ये रस दिसतोय बाकी प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळच नाही दुधाचे बाजार भाव वाढवून देण्यास या सरकारला  वेळ नाही अशी टीका आमदार बबनराव पाचपुते यांनी आंदोलनाच्या निमित्ताने केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News