सोलापूर जिल्ह्यातील कुविख्यात तडीपार गुंड दौंड पोलिसांच्या जाळ्यात,अटक करून दिले सोलापूर पोलिसांच्या ताब्यात


सोलापूर जिल्ह्यातील कुविख्यात तडीपार गुंड दौंड पोलिसांच्या जाळ्यात,अटक करून दिले सोलापूर पोलिसांच्या ताब्यात

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या गुन्ह्यात तडीपार केलेला सराईत गुन्हेगार विनायक उर्फ बटल्या गौतम शिंघे वय 24 हा जबरी चोऱ्या करून पसार झाला होता,सोलापुर पोलीस त्याच्या मागावर होते, हा सराईत गुन्हेगार दौंड परिसरात आला असल्याची खात्रीलायक माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली त्यानुसार सुनील महाडिक यांनी पोलीस हवा पांडुरंग थोरात,पो हवा असिफ शेख,पो कॉन्स्टेबल अमोल देवकाते,अमोल गवळी,किरण राऊत, रवि काळे यांचे एक पथक तयार करून सदर आरोपींच्या मागावर पाठवले,त्यावेळी सदर गुन्हेगार पुणे सोलपूर हायवे वर हॉटेल महाराणा जवळ संशयित रित्या फिरत असल्याचे त्यांनी पाहिले,त्याला पोलिसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागला होता परंतू दौंड पोलिसांनी सिताफिने ताब्यात घेऊन दौंड पोलीस स्टेशन येथे आणले,त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे,या कामगिरी बद्दल दौंड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे,वरिष्ठांनी सुद्धा या टीमचे कौतुक करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News