गावे जलसमृध्द करण्यासाठी शिवार शिवधनराई बंधारे योजना राबविण्याची मागणी


गावे जलसमृध्द करण्यासाठी शिवार शिवधनराई बंधारे योजना राबविण्याची मागणी

आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार बंधारे बांधण्यासाठी करणार मार्गदर्शन

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) पाऊसाचे पाणी अडवून त्याचे नियोजन करण्यासाठी शिवार शिवधनराई बंधारे योजना राबविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. तर गावागावात ग्रामस्थांनाशिवार शिवधनराई बंधार योजनेतंर्गत बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले असून, या योजनेसाठी शासनाच्या आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण, तलाव, विहीर सर्व जलस्त्रोत पुर्ण क्षमतेने भरले आहेत. ओढे, नाले वाहत असून, त्यामध्ये मुरुम व काळी मातीने भरलेल्या गोण्या टाकून पाणी अडवून बंधारे उभी करण्याची गरज आहे. भविष्याच्या दृष्टीने गाव पाणीदार होण्यासाठी या पध्दतीने कार्य होण्याची गरज आहे. प्रत्येक गावातील ओढे, नाल्यात अशा पध्दतीने बंधारे उभे केल्यास पाऊस संपल्यानंतर देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात अडवणुक केली जाणार आहे. परिणामी हे पाणी जमिनीत मुरुन भूजलपातळी वाढणार आहे. मनरेगाचा मोठा निधी यासाठी वापरल्यास प्रत्येक गाव पाण्याबाबत समृध्द होण्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने त्वरीत निर्णय घेऊन या पध्दतीने शिवार शिवधनराई बंधारे योजना राबविण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी देखील शासनावर विसंबून न राहता ही योजना यशस्वी करण्यासाठी जलश्रमदानसह ट्रॅक्टर, जेसीबी आदि साधनांद्वारे मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे गाव जलसमृध्द होऊन शिवार बहरणार आहे. तर शेतकर्‍यांचा विकास साधला जाणार आहे. या योजनेकडे दुर्लक्ष झाल्यास व भविष्यात पाऊस कमी पडल्यास पुन्हा दुष्काळाचे तोंड पहावे लागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. या योजनेसाठी संघटनेच्या वतीने कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, ज्ञानदेव काळे, ओम कदम, विलास लामखडे यांचे शिष्टमंडळ जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन सदर योजना कार्यान्वीत करण्याची मागणी देखील करणार आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News