सचिन गुलदड यांची मानवाधिकार संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड !!


सचिन गुलदड यांची मानवाधिकार संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

अँटी करप्शन अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली 

   मा.श्री.दीलीप कुराडे  यांच्या उपस्थितीमध्ये लोक नेते,महाराष्ट्र भुषण,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सचिनभाऊ गुलदगड यांची मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा अहमदनगर येथे सत्कार करण्यात आला

 यावेळी कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसुल सभापती मा.श्री.मकरंदभाऊ सोनवणे,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर ऊत्तर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.मुकुंद मामा काळे,संवत्सर प्रगतशील शेतकरी श्री.रमेशआंण्णा ससाणे,अंदरसुलचे श्री.चंद्रकांत सोनवणे व श्री.गणेशजी गायकवाड आधी उपस्थित होते.

 श्री.मकरंदभाऊ सोनवणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना सामाजिक कार्यात आपला असाच ठसा उमटवावा अशा सदिच्छा दिल्या व श्री.मुकुंद मामा काळे यांनी सर्व पदाधिकारी यांनी सर्वांना असेच एकोप्याने पुढे घेऊन जाऊन सर्व जनसामान्यांना मदत होत रहावी व उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करत रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघ तालुका अध्यक्ष अशोकजी माळवदे,शहर प्रमुख शेखर बोरावके,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,योगेश ससाणे,संदीप डोखे,मनोज चोपडे,अनंत वाकचौरे,धोत्रे पोलिस पाटील देवेश माळवदे,सुनिल मंडलिक आदींनी अभिनंदन व भावि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News