शिर्डी प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे
कोरोनाचा योद्धा उपाशी ,अधिकारी मात्र तुपाशी ,अशीच घटना राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यावर आली आहे,सर्वसामान्य कर्मचाऱयांना वेठीस धरले जाण्याचा प्रकार राहता तालुक्यात होतांना दिसत आहे
सध्या सर्व भागात कोरोना या आजाराने थैमान घातले असून आरोग्य कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून त्यांचे उपचार कर असताना त्यांच्यावरच या काळात उपासमारीची वेळ आली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून गेल्या तीन महिन्यापासून आरोग्य सेवकांचे अद्याप पगार मिळालेला नाही यासाठी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी माननीय तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना नियमित पगार होण्याचे निवेदन देण्यात आले आहे लॉक डाऊन च्या काळात पगार नसल्यामुळे अनेकांनी अनेकांनी हात उसनवार करून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसे घेतले आहे, काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही यासाठी वेळेवर पगार होण्याचे निवेदन माननीय तहसीलदार व गटविकास अधिकारी राहता यांच्याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले अरे यावेळी राहता तालुक्यातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते