इंदापूर पंचायत समितीत नागरिकांना प्रवेश बंद


इंदापूर पंचायत समितीत नागरिकांना प्रवेश बंद

काकासाहेब पांढरे इंदापूर प्रतिनिधी:

इंदापुर पंचायत समितीतील पदाधिकारी कर्मचा-यासह चार जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून  पंचायत समिती कर्मचारी वगळता तालुक्यातील नागरिकांना इंदापुर पंचायत समिती मध्ये प्रवेश बंद केला असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी दिली. 

इंदापुर तालुक्यातील कोविड-19 या गंभीर साथीच्या आजाराचे रूग्ण दिवसें दिवस वाढत चालली आहे. यामुळे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, तालुक्यातील लोकांनी बेजबाबदारपणे न राहता गरज असेल तरच घराबाहेर पडा, तसेच  गावत,  तालूक्याच्या ठिकाणी व अंन्य ठिकाणी गेला तर सुरक्षित अंतर ठेवून तोंडाला मास्क लावून संचार करावा तसेच तालुक्यातील 55 वर्षावरील शुगर, बी पी, दमा सारख्या हाय रिस्क व जेष्ठ नागरिक यांनी स्वता:हाची  काळजी घेऊन घरातच बसून रहावे.  कोविड 19 हा गंभीर साथीच्या आजार आटोक्यात आणण्यासाठी पंचायत समिती स्तराहून विविध उपाययोजना सुरू असल्याचेही शेवटी गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News