वाहनाचा ना-वापर ऑनलाईन पध्दतीने घोषित करता येणार!! श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती


वाहनाचा ना-वापर ऑनलाईन पध्दतीने घोषित करता येणार!! श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी : 

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नोंदणी झालेली वाहने "वाहनाचा ना-वापर" घोषित करणे तसेच मुदतपुर्व वाहन ना-वापरातून काढणे यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांना सुचित करण्यात येते की, ज्या वाहनधारकांना त्यांचे वाहन "ना-वापरात" ठेवायचे आहे, अशा वाहन मालकांनी त्यांच्या वाहनाचा ना-वापर अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.parivahan.gov.in या संकेत स्थळावर महिना संपण्याअगोदर सादर करावा. अधिक माहितीसाठी श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.अ.अ.खान यांनी कळविले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News