अहमदनगर-मनमाड राज्य महामार्गावर शिर्डी परिसरातून ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थांची वाहतूक बायपासमार्गे वळविली


अहमदनगर-मनमाड राज्य महामार्गावर शिर्डी परिसरातून ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थांची वाहतूक बायपासमार्गे वळविली

जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले आदेश जारी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

दि.28 : शिर्डी शहरात दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने तसेच श्री साई समाधी मंदिर, शिर्डी  व साई भक्त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या नियम 115 मधील तरतूदीनुसार आणि दिनांक 20 सप्टेंबर,1990 च्या शासन अधिसूचनेनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अहमदनगर ते मनमाड (एमएच एमएस दहा) या राज्य महामार्गावरुन जाणारे ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थांची वाहतूक करणारे टँकर, गॅस/केमीकल टँकर व अवजड वाहने श्री साई मंदिराजवळून न जाता ती कायमस्वरुपी निघोज-निर्मळपिंप्री बायपासने वळविण्याचे आदेशित केले आहेत. तसेच शिर्डी शहरासाठी येणारे गॅस, पेट्रोल व डिझेलचे टँकर लक्ष्मीनगर टी पॉईंट ते आरबीएल चौक या बाहयवळण मार्गाने कायमस्वरुपी वळविण्याचेही अधिसूचित करण्यात आले आहे. उपरोक्त नमूद ठिकाणी मोटार वाहन कायदा 1988 च्या नियम 116 अन्वये दिशादर्शक फलक, वाहतूक चिन्हे वाहनचालकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी  संबधित यंत्रणेने उभारण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News