औद्योगिक वसाहतीतअंजनीसुर्य हेल्थ क्लबच्या वतीने वृक्षारोपनाचा उपक्रम !!


औद्योगिक वसाहतीतअंजनीसुर्य हेल्थ क्लबच्या वतीने वृक्षारोपनाचा उपक्रम !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव येथील औद्योगिक वसा हतीमधील अंजनीसुर्य हेल्थ क्लब यांच्या वतीने परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.कोपरगाव शहर तसेच ग्रामिण भागात कोराना विषाणुचा वाढता प्रार्दु भाव रोखण्या हेतुने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चार दिवसाची टाळेबंदी जाहीर असल्याने या रिकाम्या वेळात सामाजिक कार्य करण्याचा उद्देशाने कोपरगाव औद्योगिक वसाहत येथील प्लॉट नं ४१मधील अंजनीसुर्य हेल्थ क्लब परिसरात पै.दिपकभाऊ कांदळकर, डाउच खुर्द गावचे लोकनियुक्त सरपंच  पै पै.संजय गुरसळ,ऋषीकेश ससाणे,देवा पवार,अमन चोपडा,तुषार व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत हेल्थ क्लब परीसरात वृक्षारोपनचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ म्हणाले कि पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होतअसलेली वनराई हे देखील कारणीभूत असल्याने मागील काही वर्षापासून पर्जनमान अनियमित तसेच कमी अधिक प्रमाणात होत परिस्थिती अशीच राहिल्यास भावी पिढीचेभविष्य हे निश्चितपणेअंधकारमय होऊ शकते. त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड बरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने हि जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली

ते पुढे म्हणाले उत्तमआरोग्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे यात काही शंका नाही शरीर एखाद्या मशीनसारखेच आहे जर मशीन सतत चालू राहिली तर ते चांगले कार्य करते.तरी यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे सांगत व्यायाम करण्याचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्लाही संजय गुरसळ यांनी यावेळी दिला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News