महाराष्ट्र राज्य धनगर युवा मल्हार सेनेच्या अहमदनगर जिल्हा समितीची ऑनलईन सभा संपन्न !


महाराष्ट्र राज्य धनगर युवा मल्हार सेनेच्या अहमदनगर जिल्हा समितीची ऑनलईन सभा संपन्न !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या अहमदनगर जिल्हा कमिटीची सर्वसाधारण सभा मा.जिल्हाअध्यक्ष श्री.शहादेव मामा गुंजाळ यांच्या अध्यक्षेखाली पुर्ण झाली, सस्थापंक अध्यक्ष मा.श्री.मनोज  सिराम सर तसेच कार्याध्यक्ष श्री.गणेशभाऊ पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

या सभेमध्ये शासनाने आदिवासी समाजाप्रमाणे धनगर समाजाला विविध योजना लागु व्हाव्या तसेच सरकारकडुन समाजातील विद्यार्थाना काॅलरशिप मिळवुन देण्याचे काम संघटने मार्फत करण्यात यावे,समाजावर होणा-या अन्यायाचा पाठपुरावा शासकीय अधिकारी यांच्याकडे करणे तसेच

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी गाव तेथे शाखा सुरू करन्यासाठी प्रयत्न करणे.

आरक्षण विषयक चळवळ नव्याने उभी करावी या विषयावर ऑनलाईन मिटींगमध्ये चर्चा झाली

यामध्ये  जिल्हाउपाध्यक्ष नानासाहेब कायगुडे,जिल्हासचिव धनजंय माने,जिल्हा कार्याध्यक्ष आण्णासाहेब कांदळकर,जिल्हासंघटक श्री.प्रदिप पांढरे,जिल्हाप्रद्धिप्रमुख  दिपक पारखे  नेवासा तालुकाअध्यक्ष श्री.श्रीराम देशमुख,कोपरगांवतालुकाध्यक्ष सोमनाथ हिरे,पारनेर तालुकाध्यक्ष  अरुण गुजर,कर्जत तालुकाअध्यक्ष बाळासाहेब दातिर,गणेश शेंडगे, बापुसाहेब,अंकुशराव ,श्री.भारत शिंदे युवक जिल्हाअध्यक्ष ,व इतर सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते प्रस्तावना कार्याध्यक्ष श्री.गणेश भाऊ पळसकर यांनी केली व श्री.धनजंय माने यांनी सर्वाचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News