श्रीगोंदयात एकाच दिवशी ३ कोरोना बळी: नवीन १२ जण संक्रमित.


श्रीगोंदयात एकाच दिवशी ३ कोरोना बळी: नवीन १२ जण संक्रमित.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी:

श्रीगोंदा तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील गुरुवार दि.२७ रोजी तिघांचा कोरोनामूळे मृत्यू झाला. पिंपळगाव पिसा येथील ४५ वर्षीय पुरुष, जंगलेवाडी येथील ८० वर्षीय महिला व निमगाव खलू येथील ५६ वर्षीय पुरुष कोविड केंद्रात उपचार घेत होते. जास्त त्रास झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांनी श्रीगोंदा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरू केले. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने तिघांचा मृत्यू ओढवला. या तिघांच्या मृत्यूसह तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २३ झाली आहे.

         दि.२७ रोजी ६७ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात नवीन १२ रुग्णांची भर पडली. एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ७७४ वर पोहोचली आहे. गुरुवारी २५ जण कोरोनामुक्त झाल्याने एकूण ६६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २३ जणांचा बळी गेला आहे. सध्यस्तीतीला ५८ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.

       गुरुवारी श्रीगोंदा शहरात साळवण देवी रोडवर १ रुग्ण सापडला तर ग्रामीण भागात अनगरे-२, वांगदरी-२, घारगाव-२, मुंढेकरवाडी-२, बेलवंडी-१, काष्टी-१, मांडवगण-१ असे संक्रमित रुग्ण सापडले. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News