श्रीगोंदा तालुक्यात सराईत ट्रॅक्टर व हॅरो मशीन चोर जेरबंद: ५ लाखाच्या मुद्देमालासहीत अटक: गुन्हा दाखल झाल्या दिवशीच कारवाई.


श्रीगोंदा तालुक्यात सराईत ट्रॅक्टर व हॅरो मशीन चोर जेरबंद: ५ लाखाच्या मुद्देमालासहीत अटक: गुन्हा दाखल झाल्या दिवशीच कारवाई.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी:

श्रीगोंदा तालुक्यात तांदळी दुमाला शिवारातुन पॉप्युलर कंपनीचे हॅरो मशिन व ट्रॅक्टर चोरी करणारा सराईत गुन्हेगार लाख रुपयांच्या मुद्देमालासाहित श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात.

दि. २७ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तांदळी दुमाला गावाच्या शिवारात फिर्यादी दादा बलभिम गव्हाण वय ५३ वर्षे रा.तांदळी दुमाला. ता.श्रीगोंदा

यांच्या शेतात पॉप्युलर कंपनीची हॅरो मशिन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी यांनी सुरू केला.  दिनांक २७ रोजी अमित माळी यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की हॅरो मशिन चोरुन ते ट्रॅक्टरला जोडुन घेवुन एक ईसम तांदळी दुमाला गावाकडुन मांडवगण रोडच्या दिशने घेऊन जात आहे.गुन्हा दाखल झाल्या दिवशीच तातडीने

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित माळी यांच्या पथकाने मांडवगण महांडुळवाडी शिवारात  ट्रॅक्टरसह मशिनवर छापा टाकुन शिथापीने सापळा रचुन सदर ट्रॅक्टर वरिल ईसमास ताब्यात घेतले.  चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. व मशीन विक्रीसाठी चालवले होते.व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. त्याच्या ताब्यातुन १ लाख रुपये किंमतीचे पॉप्युलर कंपनीची हॅरो मशिन व  ४ लाख रुपये किंमतीचामहिंद्रा कंपनीचा सरपंच ट्रॅक्टर  जप्त केला आहे. आरोपीकडून अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

              सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी,पोलीस हवालदार संजय कोतकर,प्रकाश दंदाडे,वैभव गांगर्डे यांच्या पथकाने  केली आहे.

        पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी व कॉन्स्टेबल वैभव गांगर्डे हे करित आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News