चांदेकसारे ग्रामपंचायतचा वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!


चांदेकसारे ग्रामपंचायतचा वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. |

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतचा वतीने दि२७ ऑगस्ट माजी सरपंच केशवराव होन यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. 

               कोराना संसर्गाचा सावटाखाली झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत विद्यार्थांनी घवघवीत यश मिळवले असुन या त्यांच्या परीश्रमाची पावती म्हणुन चांदेकसारे गावातील तसेच पंचक्रोशीतल्या  इ.१०वी12 वीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनीचा ग्रामपंचायातच्या वतीने सत्कार करून त्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी सरपंच केशवराव होन यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,कुठल्याही क्षेत्रात जिद्द,चिकाटी आणि कामात प्रामाणिकपणा असेल तर त्या क्षेत्रात यश हे भेटतच अशा प्रकारे आपण देशाच,राज्याचे, तसेच जिल्ह्याचे आणि चांदेकसारे पंचक्रोशीचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी चांदेेकसारेच्या सरपंच सौ पुनम खरात,उपसरपंच श्री विजय केशवराव होन,विठ्ठल होन सर,दिलीपराव होन,नारायण हरिभाऊ होन,अर्जुन होन, ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच चांदेकसारे गावातील ज्येष्ठ नागरिक,पालक वर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News