प्रशासन व आरोग्य विभाग राबवणार कोपरगावात कोरोना संसर्ग निर्मुलन अभियान !!


प्रशासन व आरोग्य विभाग राबवणार कोपरगावात कोरोना संसर्ग निर्मुलन अभियान !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव शहरात कोरोना संसर्ग आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड) यांचे संकल्पनेतून आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,शहरी आरोग्य अभियानाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री आहेर(कांडेकर) यांचे विशेष प्रयत्नातून कोपरगांव शहरात शुक्रवार दि.२८ आँगस्ट २०२० ते ३१ आँगस्ट २०२० पर्यंत कोरोना संसर्ग निर्मुलन अभियाना राबविण्यात येणार आहे.

तहसिलदार योगेश चंद्रे,गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्णालय,कोपरगांव,डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,कोपरगांव, आरोग्य विभाग पंचायत समिती कोपरगांव यांचे यंत्रणेमार्फत हे अभियान राबविण्यात येणार आहे.कोपरगांव शहरातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका, बहुउद्देशिय आरोग्य सेवक,शिक्षक अशा ७५ जणांना एकदिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग बाधित रुग्ण प्रमाण वाढत असलेल्या उपनगरात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.यात गांधीनगर, महादेवनगर,गोरोबानगर, दत्तनगर,टिळकनगर,विवेकानंद नगर,सप्तर्षीमळा,कालेमळा, सुभाषनगर,संजयनगर, समतानगर,निवारा,सुभद्रानगर या उपनगरांचा समावेश करण्यात आला आहे.

चार दिवस कोपरगांव शहरात लाँकडाऊनच्या काळात सुरु करण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करणार आहे.यात डायबेटीस,दमा,कँन्सर तसेच सर्दी,खोकला,ताप आजाराने बाधित रुग्नांची कोरोना लक्षण संदर्भात प्राथमिक तपासणी केली जाणार आहे.जेणे करुन अशा दुर्धर आजाराने बाधित त्या रुग्णास दिलासा मिळेल.प्रशिणार्थींची १७ पथके तयार करण्यात आली असून ६ नियंत्रण अधिकारी नेमण्यात आले आहे.कोपरगांव शहरातील रुग्णांच्या घरापर्यंत पोहचून तपासणी,पुढील उपचार आणि समुपदेशन केले जाणार आहे. या प्रसंगी निवासी नायब तहसिलदार योगेश कोतवाल उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यशाळेचे सुत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके,तर आभार साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी यांनी मानले. कोपरगांव प्रशासन आणि वैद्यकीय विभागाने टाकलेल्या या क्रांतिकारक पाऊलाचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News