समृद्धी महामार्गात विना वेष्ठणच टाकल्या भूमिगत वीजवाहिन्या आमदार आशुतोष काळेंनी केली समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराची पोलखोल !!


समृद्धी महामार्गात विना वेष्ठणच टाकल्या भूमिगत वीजवाहिन्या  आमदार आशुतोष काळेंनी केली समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराची पोलखोल !!

आमदार आशुतोष काळेंकडून ठेकेदार व अधिकाऱ्यांची खरडपट्टी. ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                  समृद्धी महामार्गामध्ये ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जात आहे त्या ठिकाणी भूमिगत टाकण्यात येणाऱ्या वीजवाहिन्यांना टणक पाईपाचे वेष्टन असणे व वीजवाहिन्या आराखड्यानुसार जमिनीखाली योग्य अंतरावर असणे बंधनकारक आहे जेणेकरून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात यदाकदाचित या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर त्या वीज वाहिन्या दुरुस्त करता येणे शक्य होईल. मात्र सबंधित ठेकेदाराने कोणत्या प्रकारचे वेष्ठण पाईप वापरले याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार आशुतोष काळेंना सदर वीजवाहिन्या वीणा वेष्ठणच टाकल्याचे निदर्शनास येताच सबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे अधिकारी, महावितरण व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची आमदार आशुतोष काळे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

                           यापूर्वी समृद्धी महामार्गाबाबत झालेल्या विविध बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे व दिलेल्या सूचनांप्रमाणे आजतागायत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यासाठी असणाऱ्या नियंत्रण कार्यालयात गुरुवार (दि.२७) रोजी बैठक घेतली. या बैठकी दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बुजलेल्या चाऱ्या, विविध ठिकाणी प्रस्तावित व आवश्यक असलेल्या ठिकाणी करावयाचे असलेले युटीलिटी डक्ट (वापर बोगदा), कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेली कंपनी वापरत असलेले ग्रामीण मार्ग (व्ही.आर) तसेच इतर जिल्हा मार्ग (ओ.डी.आर.) यांची दुरुस्ती, समृद्धी महामार्गामुळे वीज वाहिन्यांचे निर्माण झालेले प्रश्न, समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या सहठेकेदारांनी मशिनरी मालकांचे व कामगारांचे थकविलेले पेमेंट, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज घेतले आहे त्या गौण खनिजाची उत्खनन व वाहतूक करतांना खराब झालेले रस्ते व निर्माण शेतकऱ्यांच्या अडचणी, तसेच समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या स्थानिक कामगारांच्या अडचणी याबाबत चर्चा करून आमदार आशुतोष काळे यांनी आढावा घेतला. या बैठकीदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेल्या वीज वाहिन्यांना ठेकेदार निकृष्ट दर्जाचे वेष्टन पाईप वापरत असून नागरिकांना समजू नये यासाठी रात्रीच्या वेळीच हे काम उरकून घेत असल्याच्या तक्रारी आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या.

- वीज वाहिन्यांना कोणत्याही प्रकारचे वेष्टन वापरले नसल्याचे आढळून येताच अधिकाऱ्यांची खरडपट्टी करतांना आमदार आशुतोष काळे.

            त्यावेळी या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी या वीजवाहिन्या ज्या ठिकाणी रस्ता ओलांडून जात आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून जेसीबीच्या सहाय्याने उकरून समृद्धी महामार्ग ओलांडून गेलेल्या वीज वाहिन्यांची पाहणी केली. त्यावेळी या वीजवाहिन्यांना निकृष्ट दर्जाचे वेष्टण तर सोडाच परंतु या वीज वाहिन्या आराखड्याच्या पातळीनुसार खूपच वर असल्याचे व या वीज वाहिन्यांना कोणत्याही प्रकारचे वेष्टन वापरले नसल्याचे आढळून येताच संतापलेल्या आमदार आशुतोष काळेंनी सबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून चांगलीच खरडपट्टी काढली व सबंधित ठेकेदाराकडून हे काम काढून घेवून नियोजित आराखड्यानुसार उच्च दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काम देण्याच्या सूचना केल्या. तसेच यापूर्वी कोपरगाव तालुक्यात ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून गेल्या आहेत त्या सर्वच ठिकाणी उकरून महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्ग,महावितरणचे अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेवून पाहणी करावी. यापुढे ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जाणार आहे त्या ठिकाणी सर्व अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांना समोर दिवसा काम करावे असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले. या कामात गलथानपणा करणाऱ्या सर्वच दोषींवर तातडीने कारवाई करावी. तसेच अशा प्रकारचे काम कोपरगाव तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक ताताराव डुंगा व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंगचे संचालक सचिन आव्हाड, रोहिदास होन, सोपानराव आभाळे, विठ्ठलराव जावळे, केशवराव जावळे, सुधाकर होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, अंजनापूरचे सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, देर्डे कोऱ्हाळेचे सरपंच योगीराज देशमुख, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, विलास चव्हाण, कृष्णा शिलेदार, संतोष पवार, नरहरी रोहमारे, रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, टीमलीडर प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे  सूर्यवंशी,  निरगुडे,  बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.

               समृद्धी महामार्गामुळे ज्या गावातील व परिसरातील शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या छोट्या मोठ्या अडचणी सबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोडविणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांकडून याबाबत हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अडचणी गायत्री कंन्स्ट्रक्शनचे सध्या कार्यरत असलेले अधिकारी जर सोडवू शकत नसतील तर या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा व अडचणी मार्गी लावा वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याची वेळ येवू देवू नका – आमदार आशुतोष काळे.



जाहिरात
Search
विडिओ
Recent News