भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी काशिनाथ पिंगळे व उपाध्यक्षपदी विनोद गोलांडे यांची निवड


भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी काशिनाथ पिंगळे व उपाध्यक्षपदी विनोद गोलांडे यांची निवड

बारामती : भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुकाध्यक्षपदी महाराष्ट्र भूमी मराठी न्यूजचे  प्रतिनिधी काशिनाथ आबा पिंगळे यांची तर उपाध्यक्षपदी विनोद दिलीप गोलांडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ऍड.कैलास पठारे यांनी दिली.  

 बारामती तालुक्यातील करंजे याठिकाणी पत्रकारांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. पठारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

    भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. कैलास पठारे, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदर तालुका अध्यक्ष सिकंदर नदाफ, उपाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

    जिल्हाध्यक्ष ऍड. कैलास पठारे, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदर तालुका अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार विनोद पवार, सोमनाथ लोणकर, निखिल नाटकर, बाळासाहेब वाबळे, संतोष भोसले, अविनाश बनसोडे, महमद शेख आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी पत्रकार विजय गोलांडे यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकार यांचे आभार मानले. निवडीनंतर बोलताना भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे म्हणाले की, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच भारतीय पत्रकार संघामार्फत ज्या सूचना, निर्णय, संघांचे विचार असतील ते सर्वांपर्यंत पोहचविन्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News