महाविकास आघाडीमुळेच श्रीगोंदा शहराचा कायापालट : नगराध्यक्षा पोटे


महाविकास आघाडीमुळेच श्रीगोंदा शहराचा कायापालट : नगराध्यक्षा पोटे

अंकुश तुपे श्रीगोंदा(प्रतिनिधी)

-येथील नगरपालिका हद्दीतील बाजार तळ काँक्रीटीकरण,शेड उभारणी,बगीचा सुशोभीकरण,शनिचौक,जोधपूर मारुती चौक सह ७ठिकाणी हायमॅक्स,अमरधाम येथील स्मशानभूमी विकसित करणे आदी कामासाठी राज्य सरकारने ३कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

सौ.पोटे यांनी म्हंटले आहे कि श्रीगोंदा शहर तसेच पालिका हद्दीतील विकास कामातून पती माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शहराचा कायापालट केला त्यामुळे नागरिकांनी आम्हाला पुन्हा संधी दिली मात्र लोकसभा,विधानसभा निवडणूक,कोरोना संकट यामुळे नवी कामे मंजूर करताना उशीर झाला तरी देखील महाविकास आघाडीतील महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे ,जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,पालकमंत्री हसन मुश्रीफ,नगर विकास राज्य मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे ,आदींकडे,मा.आ.राहुलदादा जगताप,घनश्याम अण्णा शेलार,बाबासाहेब भोस,दीपक पाटील भोसले,गटनेते मनोहर पोटे,आपण सातत्याने विकास कामासाठी पाठपुरावा केल्याने कोरोना संकटातही वरील कामासाठी निधी मंजूर करवून घेता आला.

मनोहर पोटे म्हणाले यापूर्वी काँग्रेस,राष्ट्रवादी सरकारने पाणीपुरवठा योजना,विविध रस्ते,यासाठी कोट्यवधी रुपये निधी दिला होता विद्यमान सरकार मधील ना.बाळासाहेब थोरात,ना.प्राजक्त दादा तनपुरे यांना आपण वेळोवेळी भेटून विकास कामे मंजूर करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले या कामा बरोबरच इतर विकास कामे करण्यासाठी आपण वचनबद्ध असून लवकरच उर्वरित कामांना मंजुरी मिळेल असा विश्वास व्यक्त केला महाविकास आघाडी सरकारने निधी उपलब्ध केल्याबद्दल नगराध्यक्षा,गटनेते,महाविकास आघाडीचे नगरसेवक,नागरिकांनी आभार व्यक्त केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News