निमगाव वाघात मुस्लिम युवकांच्या हस्ते गणपतीची आरती गणेशोत्सव व मोहरम निमित्त हिंदू-मुस्लिम युवकांनी केले वृक्षरोपण


निमगाव वाघात मुस्लिम युवकांच्या हस्ते गणपतीची आरती  गणेशोत्सव व मोहरम निमित्त हिंदू-मुस्लिम युवकांनी केले वृक्षरोपण

धार्मिक एकतेचे दर्शन घडवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा (ता. नगर) येथील डोंगरेवस्ती येथे गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती गावातील मुस्लिम युवकांच्या हस्ते करण्यात आली. गणेशोत्सव व मोहरमनिमित्त उपस्थित हिंदू-मुस्लिम युवकांनी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण, प्रदुषण निवारण मंडळाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाने गावातील धार्मिक ऐक्याचे दर्शन घडले.

गणेशोत्सवानिमित्त कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेच्या वतीने दरवर्षीचे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच महिला व विद्यार्थ्यांसाठी निशुल्क विविध ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे. गावात धार्मिक एकात्मता वाढीस लागण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. नासीर चाँद शेख, साहिल शेख, जुनेद शेख यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदीप डोंगरे, नितेश डोंगरे, प्रतिभा डोंगरे, मंदाताई डोंगरे, प्रियंका डोंगरे, सोनू येवले, पै.कृष्णा डोंगरे, कार्तिक डोंगरे आदि उपस्थित होते. पै.नाना डोंगरे म्हणाले की, प्रत्येक धर्मात मानवतेची शिकवण देण्यात आली आहे. मार्ग वेगळे असले तरी ईश्‍वर प्राप्तीसाठी सत्य, अहिंसा व बंधूभाव हे तत्व पायाभूत आहे. मोहरम व गणेशोत्सव एकत्र आल्याने बंधूभाव आनखी वाढीस लागणार आहे. गावात सर्व धर्मिय ग्रामस्थ एकमेकाच्या सण-उत्सवात सहभागी होत असतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला असून, युवकांच्या माध्यमातून वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पै.संदिप डोंगरे यांनी उपस्थित युवकांना प्रसादरुपी रोपांचे वाटप केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News