इंदापूर प्रतिनिधी ( दि. २६ ऑगस्ट ) :- कोरोना रोगाचा प्रसार वरचेवर वाढत असताना याच काळामध्ये झुम अॅप च्या द्वारे ऑन लाईन मिसेस इंडिया यूनिवर्स यानी क्वारंटीन क्वीन २० २० ही स्पर्शा जागतिक मंचावर आयोजित, केली होती. यामध्ये भारता सह भारता बाहेरील परंतु भारतीय नागरीकत्व प्राप्त असलेल्या विविध देशातील महिलांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ८० महिलांनी सहभाग घेतला होता अंतीम स्पर्धेत २३ महिला राहिल्या त्यातून सौ .किमया बोरा यांची या किताबासाठी निवड झाली या निवडीने इंदापूरात आनंद व्यक्त होत आहे ही स्पर्धा १० ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान दररोज विविध प्रकारच्या
नृत्य, कोरियोग्राफी कविता, फोटोग्राफी, कुकींग नवीन नवीन गोष्टी क्रिएटीव्हीटी या अशा विविध कला असे प्रकार स्पर्धेदरम्यान घेण्यात आले शेवटी च्या दिवशी पश्नोतरे घेण्यात आली
या सर्व गोष्टी मध्ये त्या निपून असून त्यांचे कडे फॅशन इंडस्ट्री मधील रूची बोरा यांना
उपयोगी आली व त्यांना निमित्ताने व्यासपिठ मिळाले
व त्यांना संधी मिळाली आणि
सौ. किमया पियुष बोरा, यांनी मिसेस इंडिया यूनिवर्सच्या टायलेंटेड क्वारंटीन क्वीन २० २० हा किताब पटकाऊन या संधीचे सोनं केलं .
हा किताब प्राप्त झाले नंतर दैनिक जनप्रवासशी बोलताना सौ . किमया बोरा म्हणाल्या . ध्येय आणि मेहनत करण्याची चिकाटी तसेच आपल्या माणसांची खंबीर साथ असेल तर यश हमखास पदरात पडू शकते माझ्या या विजयात माझे पती पियुष बोरा सासरे श्री . संजय बोरा व सासूबाई सौ . सुनंदा बोरायांचे मोलाचे सहकार्य मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मिसेस कॉरंटाईन क्वीन सौ . किमया बोरा यांना ११ वर्षाची मुलगी व ८ वर्षाचा मुलगा असून त्यांनी विविध छंद जोपासले आहेत त्यांचे कुटूंबउच्च शिक्षीत व्यवसायीक असून त्या उत्कृष्ठ कवियत्री देखील आहेत.