नगरसेवक शाम लांडे यांचा श्री गणेश मुर्तीचे विसर्जन व मुर्ती दान उपक्रम


नगरसेवक शाम लांडे यांचा श्री गणेश मुर्तीचे विसर्जन व मुर्ती दान उपक्रम

विट्ठल होले पुणे

गणपती विसर्जनाबाबत आयुक्तांनी नियोजन करायला हवे.....योगेश बहल

पिंपरी (दि. 26 ऑगस्ट 2020) गणपती विसर्जनाबाबत आयुक्तांनी नियोजन करायला हवे होते. या ऐवजी गणपती विसर्जन नदीवर आणि सार्वजनिक हौदात करु नये असे निर्बंध पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घातल्यामुळे शहरातील लाखो गणेश भक्तांची अडचण झाली आहे. प्रशासनाची गणपती विसर्जनासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे आणि गणेश भक्तांच्या भावनेचा विचार करुन नगरसेवक शाम लांडे मित्र परिवाराच्या वतीने श्री गणेश मुर्तीचे विसर्जन व मुर्ती दान उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याचा भाविकांनी लाभ घेऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केले.

       बुधवारी (दि. 26 ऑगस्ट) कासारवाडीतील शितळादेवी मंदिर येथे या उपक्रमाचे उद्‌घाटन माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजक, नगरसेवक शाम लांडे, विरेंद्र बहल,  शितळादेवी महिला मंडळाचे सदस्य  संगिता म्हस्के, वैशाली सोहणे, पुष्पा नागपुरे, वैशाली लटांबळे, अपर्णा कडदेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेळके, रमेश बापू लांडगे, डॉ. महेश शेटे, सलीम तनवर, सयाजी लांडे, कपिल आगरवाल, संदिप साकोरे, भागवत जवळकर, मंगेश बजबळकर, संग्राम घाटविसावे, शरद बांगर तसेच प्रथम मुर्तीदान करणारे गणेश भक्त व्यंकटेश यादव आदी उपस्थित होते.

        या उपक्रमाविषयी माहिती देताना संयोजक, नगरसेवक शाम लांडे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे 22 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले. तीन महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. कोरोना बाधितांच्या वाढणा-या आकड्यांविषयी भविष्यवाणी करणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गणपती विसर्जनाबाबत नियोजन करता आले नाही. ऐनवेळी पीओपीच्या गणेश मुर्ती नको, नदिघाटावर गणेश मुर्तीचे विसर्जन नको, सर्वांनी घरीच मुर्तीचे विसर्जन करावे, सार्वजनिक कृत्रिम हौद देखिल यावर्षी मनपा प्रशासनाचे बांधले नाहीत, घरीच गणेश मुर्तीचे विसर्जन करणे सर्वांना शक्य नाही. याबाबत आयुक्तांचे नियोजन पुर्ण फसले आहे. नदिघाटावर पत्रे लाऊन, बंदोबस्त ठेऊन निर्बंध लादण्यापेक्षा ज्याप्रमाणे उद्योग, व्यवसायांना, लग्न सभारंभांना नियम, अटी घालून परवानगी दिली त्याप्रमाणे गणेश विसर्जनासाठी नियोजन करायला पाहिजे होते.

         गणेश भक्तांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करुन दरवर्षी प्रमाणे विविध ठिकाणी सार्वजनिक कृत्रिम हौद बांधून, नदिघाटांवर भाविकांना गणेश विसर्जनाची सुविधा आयुक्तांनी उपलब्ध करुन दिली पाहिजे होती. मुर्ती घरी विसर्जन करण्याबाबतच्या अडचणी दीड दिवसांचा गणपती विसर्जन करताना भाविकांनी सांगितल्या. या विषयी भाविकांची अडचण विचारात घेऊन पाच छोट्या टेंम्पोमध्ये कृत्रिम हौद केले आहेत. हे पाचही टेंम्पोतील कार्यकर्ते कासारवाडीतील परिसरात मंगळवार पर्यंत (दि. 1 सप्टेंबर) सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत फिरुन मुर्ती विसर्जन करुन घेतील. गणेश भक्तांनी विसर्जनाची आरती घरीच करावी. तसेच मुर्ती विसर्जनासाठी दोन व्यक्तींनीच यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरीकांनी येऊ नये. मास्क, सॅनिटायझर वापरावे. सोशल डिस्टन्स पाळावे. निर्माल्य स्वतंत्र कागदी पिशवित आणावे. गणेश मुर्तीचे पुर्ण पावित्र्यं राखून मनोभावे विधीवत पध्दतीने विसर्जन करण्यात येईल. या उपक्रमात सहभागी होणा-या प्रत्येक कुटूंबाला तुळसीचे रोप देण्यात येणार आहे. जमा होणारे निर्माल्य कुणाल पुरम आणि इतर गृहनिर्माण संस्थांमधिल खत प्रकल्पांसाठी देण्यात येईल. त्यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागेल. अशीहि माहिती संयोजक, नगरसेवक शाम लांडे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News