शाहू महाराज व नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल जालिंदर बोरुडे यांचा सत्कार


शाहू महाराज व नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

अंधकारमय जीवनात सर्वसामान्यांसाठी आशेची किरण म्हणून जालिंदर बोरुडे यांचे कार्य -भगवान फुलसौंदर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नेत्रदान चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच गरजू घटकांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाची आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणारे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार आणि नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल बुरुडगाव येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी बोरुडे यांचा सत्कार केला. यावेळी अनिल बोरुडे, अनिल झोडगे, अशोक कानडे, विष्णू फुलसौंदर, राजू चाफे, सुनिल राऊत, अशोक गोरे आदि उपस्थित होते. 

जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू घटकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन अनेकांना दृष्टी मिळवून दिली आहे. तसेच फाऊंडेशनच्या पुढाकाराने अनेक नागरिकांनी केलेल्या मरणोत्तर नेत्रदानाने अनेकांना नव दृष्टी लाभली आहे. तसेच कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील आपली आरोग्यसेवा चालू ठेऊन त्यांनी सर्वसामान्यांना मोठा आधार दिला आहे. या कार्याची दखल घेत सातारा येथील शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार तर दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने नेत्रदूत हा पुरस्काररुपी सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 

भगवान फुलसौंदर म्हणाले की, अंधकारमय जीवनात सर्वसामान्यांसाठी आशेची किरण म्हणून जालिंदर बोरुडे यांचे कार्य सुरु आहे. माणुसकीच्या भावनेने झपाटलेला हा माणुस दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी देण्याचे कार्य करीत आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांनी माणुसकी विसरली असली, तरी अशा सामाजिक कार्यकर्त्यांमुळे सर्वसामान्यांना आधार मिळत आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या शिबीराद्वारे बोरुडे यांनी अनेकांना नवदृष्टी मिळवून दिली असून, याचा लाभ तळागाळातील व्यक्तींना झाला आहे. नगर जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ते नेत्रदूत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अनिल बोरुडे यांनी अनेकांना नवदृष्टी मिळवून दिली असून, याचा लाभ तळागाळातील व्यक्तींना झाला आहे. नगर जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ते नेत्रदूत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अनिल बोरुडे यांनी फिनिक्सचे नेत्रदान अवयवदान चळवळीत सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असून, कोणत्याही प्रकारची मदत न घेता सामाजिक भावनेने घेण्यात येत असलेले नेत्र शिबीर व आरोग्य शिबीर सर्वसामान्यांसाठी आशेचे किरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून 24 वर्षाच्या कार्यकाळात पावणे दोन लाखाच्या वर गरजू रुग्णांना शिबीराच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया घडवून आनल्या आहेत. तसेच नेत्रदान चळवळीत भरीव कार्य करुन अनेक नागरिकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यास प्रोत्साहित करण्यात आले असल्याचे सांगून काळाची गरज ओळखून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान करण्याचे आवाहन केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News