अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू !


अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू !

शिर्डी, प्रतिनिधी:राजेंद्र दूनबळे

कोपरगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला नगरसेविकेच्या पतीस अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी कोकमठाण येथील करोना केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घाटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. काल दुपारी करोनाने त्यांचे निधन झाले. कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत एकूण 3 हजार 369 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. 25 ऑगस्ट पर्यंत एकूण 709 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 176 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तर 14 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ कायम आहे. काल २७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ९१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात २४ बाधित अहवाल आले आहेत. तर ६७ निगेटिव्ह अहवाल आले आहेत.

महादेवनगर एक, संजयनगर, मुर्शतपूर येथे प्रत्येकी २, तर सुभद्रानगर, येवला रोड, टाकळी, बागूल टाॅवर, इंदिरापथ येथील प्रत्येकी १, समतानगर ४, ब्रिजलालनगर १, धारणगाव, कोकमठाण, श्रद्धानगरी येथे प्रत्येकी २, संवत्सर, बाजारतळ, सुभाषनगर येथे प्रत्येकी १ असे २४ बाधित रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News