कोरोनाची साखळी सोडण्यासाठी पुन्हा संचारबंदी गरजेची !!नगराध्यक्ष विजय वहाडणे


कोरोनाची साखळी सोडण्यासाठी पुन्हा संचारबंदी गरजेची !!नगराध्यक्ष विजय वहाडणे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सामान्य जनतेत मोठी घबराट उडालेली आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत असल्याने कोपरगाव शहरात जनता संचारबंदी आमलात आणणे गरजेचे होऊन बसले आहे असे कोपरगाव चे प्रथम नागरिक विजय वहाडणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहीर केले आहे.

या द्वारे त्यांनी आपल्या भावना जनसामान्यां समोर व्यक्त करतांना सांगितले की राज्यात दररोज झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असून त्या मुळे अनेक निष्पाप लोकांचे  बळी जात आहे त्या मुळे अनेक परिवार उघड्यावर पडले आहे. अशीच परिस्थिती कोपरगाव शहरातील मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना पिडीताच्या वाढत्या अाकड्यामुळे झाली आहे त्यामुळे जनता सैरभैर झालेली आहे सामान्य जनतेत पण परत काही दिवसकरिता ही कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावे अशी कुजबुज चालू आहे परंतु शासन प्रशासनाची भूमिका पुन्हा लॉकडाऊन करण्याची नाही. त्यामुळं पण धोका वाढलेला आहे हे शंभर टक्के सत्य आहे.पुन्हा जनता संचारबंदी लागू करावी कि नाही यासाठी मी विचारविनिमय करण्यासाठी  दि.11 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयात व्यापक बैठकही घेतली होती.शहराचा प्रथम नागरिक म्हणून अशा संकटात सर्वांशी चर्चा करावी हा एकमेव हेतू होता. कुठलाही निर्णय सहमतीने व्हावा असे मला नेहमीच वाटते. एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही.त्या बैठकीत शहरातील डॉक्टर व्यापारी सामान्य नागरिक उपस्थित त्यापैकी काहींनी जनता संचारबंदी करावी असे मत मांडले तर अनेकांनी आर्थिक अडचणी वाढतात म्हणून संचारबंदी सध्या नको असे विचार मांडले.पण आता संपुर्ण कोपरगाव शहरच कोरोनाग्रस्त होते कि काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

छोटे मोठे व्यावसायिक व्यापाऱ्यात घबराट उडालेली आहे.ज्या कुटुंबात रुग्ण असतात त्यांची मानसिक व आर्थिक ओढाताण फारच भयानक आहे.गरिबांनी उपचारासाठी पैसे आणायचे कुठून हाही प्रश्नच आहे.कोणत्याही नागरिकांचा कोरोनामुळे अकाली बळी जाऊ नये कोणाचेच कुटुंब उघड्यावर येऊ नये यासाठी खरे तर आता जनता संचारबंदीची गरज आहे असे मला तरी वाटते. पण काहींना माझे म्हणणे मान्य नसेल तर माझा कुठलाच आग्रह नाही.सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण बांधील आहोत. निदान या परिस्थितीत तरी एकमेकांवर टिका टिप्पणी करून कुणीही वातावरण दुषित करणे योग्य होणार नाही.अहमदनगर मध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला दोन दोन दिवस नंबर लागत नाही. आपल्या कोपरगाववर  अशी परिस्थिती येऊ नये इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.ज्या कुटुंबातील काही बळी गेले,जे कोविडग्रस्त ऍडमिट आहेत त्यांच्या मनस्थितीचा व शहरावर आलेल्या या भीषण परिस्थितीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करावा हिच अपेक्षा.या विषयावर कुणी माझ्यावर टिका केली तरी हरकत नाही,कारण कुणी अकाली बळी जाऊ हिच इच्छा आहे अशी भावना नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी मांडली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News