मुर्शतपुर येथे ऋणानुबंध पुरुष महीला हक्क समुपदेशन समितीचावतीने शिलाई मशिन वाटप !!


मुर्शतपुर येथे ऋणानुबंध पुरुष महीला हक्क समुपदेशन समितीचावतीने शिलाई मशिन वाटप !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

आपल्या देशातील केंद्र तसेच राज्य सरकारांनी महीला सक्षमिकरणासाठी अनेक योजना राबविल्या असुन आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत सर्वच क्षेत्रात आता महिलां पुरूषाचा बरोबरीने उभ्या रहाताना आपल्या दिसत आहे आहे.तसेच शासनाने महीला सक्षमिकरणात एक पाउल पुढे जाउन महीला स्वय सहाय्यता बचत गटाची निर्मिती करुन त्या माध्यमातुन स्वय रोजगार निर्मिती व व्यवसाय प्रशिक्षण,व्यवसायासाठी भांडवल 

निर्मिती तसेच तयार झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणे यासारखे उपक्रम राबवले आहेत. या पाश्र्वभुमीवर कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे ऋणानुबंध पुरुष महिला हक्क समुपदेशन केंद्र समिती जिल्हा अध्यक्षा सौ.मंगलताई आव्हाड यांच्या वतीने दि.२४ आॅगस्ट रोजी  मुर्शतपुर (दत्तवाडी ) परिसरातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करुन हप्ता स्वरूपात हाफ शटल,फुल शटल,पिको फाॅल, शिलाई मशिनचे वाटप केले आहे. यावेळी मुर्शतपुर दत्तवाडी परिसरातील महिला सौ.मुक्ता कुदळे लीलाबाई गुंजाळ लता रणशूर प्रमिला दवंगे तसेच ऋणानुबंधचे कोपरगाव तालुका कार्यकारी अध्यक्ष संजय आव्हाड २४ तास चे न्यूज रिपोर्टर गणेश रणशूर व गावातील नागरिक सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.व गटाच्या मॅनेजर सविता परदेशी सहयोगिनि रोहिणी दंडवते उपस्थित होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News