मुलभूत सोयीसुविधा मिळण्यासाठी सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलनाचा प्रस्ताव


मुलभूत सोयीसुविधा मिळण्यासाठी सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलनाचा प्रस्ताव

कोरोनाच्या नावाखाली कर्तव्यात कसूर करणार्‍यांचा प्रतिकात्मक पध्दतीने कुंपनावर दगड बांधून निषेध

 कोरोना रोखण्यासाठी कॉन्टम कोरोना पंक्चर कोडचा अवलंब करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) महापालिका कर वसुली करुन देखील शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवीत नसल्याच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचर विरोधी जन आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात करवसूली सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कोरोनाच्या नावाखाली कर्तव्यात कसूर करणार्‍या जबाबदार व्यक्तींचा निषेध नोंदविण्यासाठी प्रतिकात्मक पध्दतीने कुंपनावर दगड बांधून त्यांना मृतांजली वाहण्यात आली. तर वाढत चाललेला कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टम कोरोना पंक्चर कोडचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, प्रमोद मोहळे, लताबाई कडव, उत्तम शेलार, संतोष बेंगळे उपस्थित होते. तर अनेक कार्यकर्ते वेबीनारच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी झाले होते.

महापालिका नागरिकांकडून कर वसूली करीत आहे. मात्र नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा मिळणे अवघड झाले आहे. शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे. नागरिकांना नळाद्वारे दुषित पाणी येते. तर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. पाणी, वीज व रस्ते या प्रमुख नागरी सुविधांपासून सर्वसामान्य नगरकर वंचित आहे. कोरोनाच्या नावाखाली अजूनही या प्रश्‍नाची परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोनाच्या नावाखाली अजूनही या प्रश्‍नाची परिस्थिती गंभीर बनली आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी टक्केवारी व टोळवाटोळवीत गुंतलेले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच कोरोना महामारीच्या संकटकाळात डॉक्टर, शासकीय अधिकारी, न्यायधीश आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न अधिक बिकट बनत चालले आहेत. इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार मिळणे कठिण झाले आहे. अनेक सरकारी कामे अडकली आहेत. तर सर्वसामान्यांसाठी न्यायालयाची दारे बंद असल्याने न्याय कोणाकडे मागावा असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे अनेक जबाबदार व्यक्ती माणुसकी विसरुन कुंपनावर बसून दगडासारखा झाल्या असल्याचे स्पष्ट करीत या प्रतिकात्मक दगडांना मृतांजली वाहण्यात आली. 

वाढत चाललेला कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांनाच कोरोनाशी लढा देण्यासाठी कोरोना वॉरिअर म्हणून सज्ज करण्याकरिता कॉन्टम कोरोना पंक्चर कोडचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायद्याचा बडगा न उगारता, नागरिकांनी आपल्या शहाणपणाने कोरोनाला शिकस्त देण्यासाठी जागृक राहण्याची वेळ आली आहे. कोरोनाचे प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनीटायझरचा वापर, गर्दी न करणे, गरजेच्या वेळेस घराबाहेर पडणे आदि नियमांचा या कोरोना पंक्चर कोडमध्ये समावेश असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. नागरी सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांनी जागृक होण्याची गरज असल्याचे प्रमोद मोहळे यांनी सांगितले.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News