दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांना अर्जुन पुरस्कार जाहिर हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार


दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांना अर्जुन पुरस्कार जाहिर हर्षवर्धन पाटील यांनी केला  सत्कार

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. २५ ऑगस्ट ) :

 सुयश जाधव यांना भारत सरकारने  यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुयश जाधव यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.  

           करमाळा तालुक्यातील पांगरे या खेडे गावातील सुयश जाधव यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपघातात दोन्ही हात गमावले असतानाही  अर्जुन पुरस्कारा सह अनेक पुरस्कार कमावले आहेत.   

         राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार , एकलव्य पुरस्कार असे सुयश जाधव यांनी  एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके पटकावली. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केलीय. 2016 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयश यांनी देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिला आहे

आजवरची सर्व कामगिरी पाहून भारत सरकारने सुयश जाधव यांना यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केलाय. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुयश यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News