थोडसं मनातलं.. "गाढव ही गेलं अन् ब्रम्हचर्य ही गेलं" ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडसं मनातलं..  "गाढव ही गेलं अन् ब्रम्हचर्य ही गेलं"  ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो 

अहमदनगर जिल्ह्यातील आणि शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे हे खरोखरच धोकादायक ठरू शकते. प्रशासन कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे परंतु अजुन तरी पुर्णपणे यश आलेले दिसत नाही. तरीही रूग्ण ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे ही सुद्धा दिलासा देणारी बाब आहे. सध्या अहमदनगर शहरात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणी हा होय. अहमदनगर शहरात मृत्यू झालेल्या लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी  सध्या फक्त केडगाव, रेल्वे स्टेशन आणि नालेगाव येथील असे एकुण तीनच अमरधाम आहेत. तसेच सध्या फक्त अमरधाम येथील एकच विद्युतदाहिनी सुरू आहे. त्यातच संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील कोविड-19 चे मृतदेहांवर  फक्त नालेगाव येथील एकाच अमरधाम येथेच अंत्यसंस्कार केले जातात. अगदी काल परवा शिवसेनेचे पदाधिकारी प्रथम महापौर श्री भगवान फुलसौदर, नगरसेवक श्री बाळासाहेब बोराटे, माजी महापौर श्री अभिषेक कळमकर आणि इतर पदाधिकारी यांनी अमरधाम येथे मृतदेहाची कशा प्रकारे अवहेलना केली जाते आणि कशा प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात याचे निवेदन मा.आयुक्त साहेब यांना दिले आहे. वास्तविक काही जणांना हा राजकीय स्टंट जरी वाटत असला तरीही कोविड-19 च्या मृतदेहाची विटंबना होत आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. त्यातच आता एकाच वेळी अमरधाम येथे दररोज जवळपास दहा ते बारा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे प्रचंड धुर निघत असुन त्यामुळे नालेगाव येथील नागरिकाचे आरोग्यासाठी हानीकारक असल्याने नालेगाव येथील नागरिकानी सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातील मृतदेहावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला आहे. त्यातच दुसरी विद्युतदाहिनी बंद असल्याने सर्व मृत्यू देहावर  सरण रचूनच अंत्यसंस्कार करावे लागतात त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी नंबर लागतात. वास्तविक पाहता राज्य सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या शिवाय हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत नाही. जर महापालिका कडे पुरेसा निधी उपलब्ध नसेल तर राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. परंतु इथेही राजकारण आडवे येण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत ती शिवसेना नगर महापालिका मध्ये सत्तेवर नाही. महापौर भाजपा चे आहेत त्यामुळे सध्या भाजपा आणि शिवसेना यांचे सख्य संपूर्ण राज्याला माहिती आहे. वास्तविक हा जरी राजकीय भाग असला तरी मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे तरी अहमदनगर महापालिकेला जास्त निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील तीन ही मंत्री महोदय तसेच सर्व आमदार महोदय आणि खासदार महोदय यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. एक मात्र निश्चितच आहेकी सध्या कोविड-19 ने अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सध्या हैराण झाली आहे. खासगी दवाखान्यात उपचार घेणे परवडणारे निश्चितच नाही त्यामुळे शासकीय दवाखान्यात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत तरच गोरगरीब व वंचित आणि सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोकांचा प्रश्न सुटेल असे वाटते. महापालिका कडे शहरातील घरपट्टी, पाणी पट्टी इ कराचे माध्यमातून निधी उपलब्ध होत असतो. परंतु आता लाॅकडाऊन च्या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे निश्चितच काही लोकांनी कर जमा केलेले नाहीत. अर्थात महापालिकेचे कर गोरगरीब व सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोकांकडे कमी प्रमाणात थकलेले आहेत या उलट धनदाडंगे लोकांनी जास्त कर थकविले आहेत हे मागे एकदा महापालिकेच्या अधिकारी यांनी फ्लेक्स बोर्ड लावून जाहीर केले होते. जर लोकांनी आपले कर वेळेवर भरले तर महापालिका कडे निश्चितच निधी उपलब्ध होईल आणि त्यातुन सुधारणा करता येईल. हा झाला जर तर चा प्रश्न, पण सध्या तरी सर्व पक्षिय नेत्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महापालिका प्रशासना कडून खरोखरच कोविड-19 च्या मृतदेहाची विटंबना होत आहे ही बाब खटकणारी आहे. बेवारसपणे मृतदेह जाळले जातात आणि त्यांच्या सरणा समोर मृत्यू झालेल्या लोकांचे फरशीवर नाव लिहून ठेवतात हे खरोखरच न पटणारे आहे.या साठी महापालिका प्रशासन यांनी अत्यावश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. नाहीतर उद्याच्या काळात सर्व सामान्य जनतेला अंदोलने करण्याची गरज पडणार आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती. आता सध्या तर महापालिका प्रशासन यांचे "गाढव ही गेलं अन् ब्रम्हचर्य ही गेलं " अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. वैयक्तिक कोणत्याही माणसाचा दोष नसतो पण प्रशासन म्हणून मा आयुक्त साहेब यानांच जबाबदारी घ्यावी लागेल हे पण सत्य आहे. लवकरच अंत्यसंस्कार करण्यासाठी असणारी व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची तितकीच आवश्यकता आहे. एक तर दवाखान्यातून मृतदेह लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले जात नाहीत अशा वेळी त्यांचे कुटुंबीयांना किती यातनां सहन कराव्या लागल्या आहेत याची जाणीव सुद्धा महापालिका प्रशासन यांनी ठेवली पाहिजे. कोविड-19 च्या भिती पोटी कीती तरी नातेवाईक आणि घरातील मंडळी मृतदेह घरी सुद्धा आणत नाही, पण काही महापालिका कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात हे पण सत्य आहे. अशा वेळी सर्वानीच संयमाने घेतले पाहिजे असे वाटते आहे. नाहीतर उद्याच्या काळात कोविड-19 संपूर्ण जिल्ह्यातील गल्ली बोळात शिरलेला दिसेल यात शंकाच नाही. नागरिकांनी सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आफवाना बळी पडू नये हि विनंती आहे. शासकीय आदेश आणि सूचना चे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. कोविड-19 चे संदर्भात व दवाखाना आणि बिलाचे संदर्भात  कोणत्याही प्रकारची अडचण आली तर निःसंकोचपणे जिल्हाधिकारी श्री राहुल द्विवेदी साहेब, शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप साहेब, महापालिका आयुक्त श्री मायकलवार  साहेब स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना फोन करून अथवा प्रत्यक्षात भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या तर निश्चितच प्रश्न सुटेल असे वाटते आहे. जे खाजगी हाॅस्पिटल जास्त प्रमाणात बिलाची आकारणी करतील त्यांची तक्रार भरारी पथकातील सन्माननीय सदस्य यांचेकडे करण्यात आली पाहिजे. परंतु विनाकारण कोणत्याही खाजगी हाॅस्पिटल ला बदनाम करू नका हि विनंती. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा आहे. कृपया आपण आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News