वेस्टर्नच्या वतीने पुरंदर मधील दिव्यांगाना मदतीचा हात


वेस्टर्नच्या वतीने पुरंदर मधील दिव्यांगाना मदतीचा हात

रानमळा (ता पुरंदर) येथे दिव्यांग बांधवांना किराणा कीट चे वाटप करीत असताना उपसरपंच वंदना जगताप व इतर मान्यवर.

सासवड (प्रतिनिधी) राजश्री बनकर।                                               पुरंदर तालुक्यामध्ये दिवसान दिवस कोरोना ची परिस्थिती वाढत चाललेली असताना काही लोकांचे रोजगार गेले तर काही लोकांना आपल्या नोकरीवरून घरी बसावे लागले अशा परिस्थितीत दिव्यांगांना कोणताही आधार नसल्याचे लक्षात आल्यानंतर बेंगलोर येथील वेस्टन कोही नाईंटीन रिलीफ मटेरियल या कंपनीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील शंभर दिव्यांगांना किराणा मालाचे कीट देऊन एक मदतीचा हात देण्यात आला.

          रानमळा (ता पुरंदर) येथे वेस्टन covid-19 रिलीफ मटेरियल या कंपनीच्या मुख्य विश्वस्त लक्ष्मी रविशंकर व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष संजय जगताप यांनी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना एक महिना पुरेल एवढा किराणामाल आज देण्यात आला त्या मालाचे वितरण रानमळा येथे करण्यात आले होते.

     यावेळी कोरोनाच्या काळामध्ये दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे त्यातच पुरंदर तालुक्यामध्ये यशवंत घरकुल योजनेत घोटाळाही झालेला आहे. या योजनेतील घरकुल मंजूर करण्यासाठी किंवा घरकुलाचे हप्ते काढून देण्यासाठी कोण लाच मागत असेल तर दिव्यांग बांधवांनी त्यास बळी पडू नये आसे जिल्हा प्रहार अपंग क्रांती संस्थेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप बोलताना म्हणाले.

       यावेळी रानमळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वंदना जगताप, प्रहार  अपंग क्रांती संस्थाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, नाना लावंड, बाबुराव काळे, सचिन सूर्यवंशी, कल्याण गावडे, दिलीप यादव, आदी मान्यवर उपस्थित होते तर कंपनीचे आभार प्रहार अपंग संस्थेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप यांनी मानले. पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, महिला अध्यक्ष सविता कामठे, मीनल पवार, दिलीप भोसले, प्रवीण खेंगरे, मीना लोहकरे, राहुल जगताप, सागर जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भोसले यांनी केले व प्रास्ताविक संपत शिंदे, यांनी केले. तर आभार सुरेश जगताप यांनी मानले.

.................


 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News