छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे चिरंतण स्फुर्तीस्थान !! शिवप्रेमी मंगेश पाटील.


छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे चिरंतण स्फुर्तीस्थान !! शिवप्रेमी मंगेश पाटील.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी व स्थापत्य अभियंता गौरव कासार यांनी कोपरगांव शहरातील शिवस्रुष्टीची प्रतिकृती छोट्या स्वरूपात घरगुती गणेशोत्सव आरासात छोट्या स्वरूपात साकारली आहे. त्याबद्दल शिवप्रेमी माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांनी त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी बोलताना मंगेश पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे चिरंतन स्फूर्ती स्थान असुन कोपरगांव शहराच्या वैभवात भर घालणारे शिवस्रुष्टीची कलाकृती घरगुती गणेशोत्सवात साकारली असल्याने मला त्याचा अभिमान आहे.

 यावेळी स्थापत्य अभियंता गौरव कासार यांचे निवासस्थानी शिवप्रेमी माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांनी मावळा पगडी,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.या वेळी सौ.भारती कासार,पत्रकार अक्षय काळे,बिपिन गायकवाड हे उपस्थित होते.घरगुती गणेशोत्सवात दरवर्षी तेअशा प्रकारच्या विविध आरास  साकारत असतात. मागीलवर्षी त्यांनी शनिवार वाड्याची प्रतिकृती त्यांनी साकारली होती.स्थापत्य अभियंता गौरव कासार यांनी साकारलेल्या शिवस्रुष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News