आरोग्य सेवेतील कर्मचारी- अधिकाऱ्यांना एक कोटीचे विमासंरक्षण कवच द्या . -गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब कल्याण महासंघ .


आरोग्य सेवेतील कर्मचारी- अधिकाऱ्यांना एक कोटीचे विमासंरक्षण कवच द्या . -गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब कल्याण महासंघ .

विठ्ठल होले पुणे

प्रतिनिधी ---  आरोग्यसेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना रुपये एक कोटीचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ यांनी केली आहे .आपल्या निवेदनात सविस्तरपणे मागणी मांडताना श्री गौतम कांबळे म्हणाले की गेल्या सहा महिन्यापासून शासकीय कोव्हीड रुग्णालयामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी- अधिकारी आपल्या प्राणाची बाजी लावून अविरतपणे covid-19 च्या रुग्णांची सेवा करत आहेत .ही सेवा बजावत असताना अनेक अधिकारी- कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यूदेखील झालेला आहे .अशावेळी या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघडे पडू नये म्हणून *शासकीयआरोग्य सेवेतील या झुंजार शिलेदारांच्या कुटुंबाला रुपये एक कोटीचे विमा संरक्षण विशेष बाब म्हणून  जाहीर करावे* व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यात यावी .आपण स्वतः आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे लढत आहात याचा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला सार्थ अभिमान आहे.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन .या संकटाच्या काळात आपण संकटाचा सामना कसा करावा याबाबत कृतीतून आम्हाला मार्गदर्शन करत आहात, त्याबद्दल संघटना आपली आभारी आहे .यापुढील काळात संघटना पूर्ण ताकदीनिशी आपल्यासोबत राहील याची आम्ही आपणास ग्वाही देतो .

शासकीय आरोग्य सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांना रुपये एक कोटीचे विमा संरक्षण व त्यांच्या कुटुंबाला अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरी देणे या संघटनेच्या मागण्या आपण विशेष बाब म्हणून मंजूर कराव्यात, एक मुद्दा इथे नमूद करू इच्छितो की, जिल्हा परिषद पुणे यांनी covid-19 साठी कामकाज करणाऱ्या सर्व अधिकारी- कर्मचारी यांना रुपये एक कोटीचे विमा संरक्षण जाहीर केले आहे.

रुपये एक कोटीचे विमा संरक्षण व अनुकंपा तत्वावर नोकरी संघटनेच्या या मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे . या निवेदनाच्या प्रती मा . उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा .अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा .मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य मा .राहुलदादा कुल आमदार दौंड मा .अरुणभाऊ गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांना देण्यात आल्या आहेत .यावेळी संघटनेचे मारुती वाघमारे ,शंकर घोडे, दादा डाळिंबे ,चंद्रकांत सलवदे, जयवंत पवार ,विजय जाधव ,सुनील रुपनवर ,अतुल जेकटे,मिलिंद थोरात व कन्हैया गौड इ .पदाधिकारी उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News