सोन्याच्या आमिषाने झालेल्या खुनातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी.


सोन्याच्या आमिषाने झालेल्या खुनातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२४:  श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे दि.२० रोजी स्वस्तात सोन्याच्या आमिषाने झालेल्या चौघा जणांच्या खुनातील गुन्ह्यात जळगाव येथील नरेश जगदीश सोनवणे (वय वर्षे २२)  याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यात २ महिला व २ तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास कामी ताब्यात घेऊन बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

        या बाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २० रोजी नगर-दौंड रोडवरील विसापूर फाटा येथे नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे (वय २२ वर्षे ), तर सूरेगाव येथील नातीक कुंजा चव्हाण (४० वर्ष), नागेश कूंजा चव्हाण (वय १६ वर्ष), श्रीधर कूंजा चव्हाण (वय ३५ वर्षे) या चौघांचा स्वस्तात सोन्याच्या आमिषाने खून झाला होता. या तपास कामी गुन्हे अन्वेषण विभाग नगर, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी विविध पथके तयार करून नगर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद याठिकाणी तपसकामी पथके रवाना करून २ दिवसांपूर्वी पुणे येथून २ महिलांसह ३ तरुणांना चौकशीकामी ताब्यात घेतले.  यातील नरेश जगदीश सोनवणे वय २२ वर्ष धंदा सेंट्रीग रा. तडवी गल्ली, विठ्ठल नगर, जळगाव याला आज दि.२४ रोजी कनिष्ठ न्यायालय श्रीगोंदा येथे हजर केले करत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली असता आरोपीचे वकील ऍड. अनिकेत दिपक भोसले यांनी युक्तिवाद केल्याने आरोपीला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News