श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी २० वा कोरोना मृत्यू: नवीन ४० सापडले.


श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी २० वा कोरोना मृत्यू: नवीन ४० सापडले.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२४: सोमवारी श्रीगोंदा येथील कोविड केंद्रात १२६ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात आजपर्यंतचा रेकॉर्ड मोडत एकाच दिवशी तब्बल ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले.त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांचा आकडा ७०९ झाला आहे. तर तालुक्यात विसाव्या मृत्यूची नोंद झाली. श्रीगोंदा शहरातील ससाणेनगर येथील ७५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा सोमवारी उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळींची संख्या २० झाली आहे.

        सोमवार दि.२४ रोजी १५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकूण ५८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या कोविड केंद्रात ७६ रुग्ण उपचार घेत आहेत.

श्रीगोंदा शहरात नवीन ८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाजीनगर-३ सिद्धार्थनगर-२,डाके मळा-२,साळवणदेवी रोड-१ रुग्ण संक्रमित सापडले. तर ग्रामीण भागात पेडगाव-६, शेडगाव-७, घारगाव-६,  काष्टी-३, उक्कडगाव-२, जंगलेवाडी-१, मुंढेकरवाडी-१, कोंडेगव्हाण-१, लोणी व्यंकनाथ-१, तरडगव्हाण-१, कोरेगाव-१, लिंपणगाव-१, म्हातारपिंप्री-१ असे संक्रमित रुग्ण सापडले. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News