कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवातील दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून धनगरगल्ली येथील साम्राज्य ग्रुप ने नगरपरीषदेला औषध फवारणीसाठी सहा ट्रक्टर उपलब्ध करुन दिले


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवातील दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून धनगरगल्ली येथील साम्राज्य ग्रुप ने नगरपरीषदेला औषध फवारणीसाठी सहा ट्रक्टर उपलब्ध करुन दिले

सज्जाद पठाण शेवगाव प्रतिनिधी : 

तसेच कोरोना यौध्दयांना मालेगाव काढा उपल्बध करुन त्याचे वाटप केले आहे. युवकांच्या या अनोख्या उपक्रामाने शेवगावकर भारावून गेले आहेत.  

         जगभर सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या काळात प्रशासनावर कमालीचा ताण आला असून कोरोनावर मात करण्यासाठी वेगेवगळे प्रयोग करण्यात येत आहेत. मात्र त्यावर उपाय सापडत नसल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. याच काळात श्री गणेश उत्सवाला परवापासून सर्वत्र सुरुवात झाली. या दहा दिवसाच्या काळात डिजे, रंगबेरंगी लाईट या इतर बाबींवर अनेक गणेश मंडळे भरमसाठ खर्च करतात. नगरसेवक सागर फडके यांच्या पुढाकाराने शहरातील धनगरगल्ली येथील साम्राज्य ग्रुपने डामडोलला फाटा देवून नगरपरीषदेला औषध फवारणीसाठी सहा ट्रक्टर उपलब्ध करुन दिले आहे. तीन ते चार दिवसाचा ट्रक्टर व डिझेलचा खर्च हा ग्रुप करणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगरपरीषद औषध व कामगारांसह शहरातील २१ प्रभागामध्ये सर्वत्र औषध फवारणी करणार आहे. साम्राज्य ग्रुपने आज सोमवार ता.२४ रोजी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याउपस्थितीत नगरपरीषदेकडे सहा ट्रक्टर उपलब्ध करुन दिले आहेत. यावेळी नगराध्यक्षा राणी विनोद मोहीते, नगरसेवक सागर फडके, ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार सारडा, गणेश कोरडे, आरोग्य विभागाचे प्रमुख समाधान मुंगसे, विजय जाधव,भारत चव्हाण, दत्तात्रय साळवे आदी उपस्थित होते.

    तसेच कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन, नगरपरीषदेच्या अधिकारी,महावितरण च्या कर्मचा-यांना व कोवीड सेंटरमधील सर्व डॉक्टर व स्टाफ यांना साम्राज्य ग्रुपच्या वतीने मालेगाव काढयाचेही वाटप करण्यात आले. ग्रुपच्या वतीने कोरोना काळातील मयत कोरोना योध्दा व नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहे. 

        हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी साम्राज्य ग्रुपचे संदीप जाधव, सचिन लवांडे, आदेश फडके, अमृत काळे, आकाश लवांडे, गणेश तोतरे, अभिषेक फडके, प्रसाद नेमाणे, आदीत्य झिरपे, अक्षय काळे, प्रसाद कबाडी, विशाल केसभट, शुभम काथवटे,महेश केसभट, ओमकार कोरडे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News