इंदापूर नगरपालिका स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये देशात १४ वा तर पश्चिम विभागात ७ वा क्रमाक मिळवून केली हॅट्रिक


इंदापूर नगरपालिका स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये देशात १४ वा तर पश्चिम विभागात ७ वा क्रमाक मिळवून केली हॅट्रिक

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. २४ ऑगस्ट ) .: स्वच्छ भारत सर्वेक्षण २0२0 मध्ये इंदापूर नगरपरिषदेने देश पातळीवर१४ वा तर देशाच्या पश्चिम विभागात ७ वा क्रमांक मिळवत ,सलग तीन वेळा क्रमांक मिळवून विजयाची हाॅट्रिक पूर्ण केली आहे . सेक्रेटरी मिनिस्ट्री आफ हाऊसिंग अँण्ड अर्बन अफिअर्सकडून, याबाबत ऑनलाईन घोषणा करण्यातआली. त्यानंतर इंदापूर नगरपरिषद कर्मचा-यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडून आनंदोस्तव साजरा केला.स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूर अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.

इंदापूर नगरपरिषदेला बक्षिस जाहीर झाल्यानंतर पुण्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,मुख्यापिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांचा सन्मान केला. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, कर्मचारी अल्ताफपठाण आदी उपस्थित होते.स्वछ सर्वेक्षण २०२० अंतर्गत पश्चिम विभागात एकूण पाच राज्यात इंदापूर नगरपरिषदेने सातवे स्थान मिळवले आहे. तर देशातील १लाख लोकसंख्येत सर्वोत्कृष्ट १००शहारांमध्ये ७ वा क्रमांक देखील मिळवला आहे.राज्यातील. बेस्ट सेल्फ सस्टैनब्लीटी शहर म्हणून बहुमान मिळाला आहे.इंदापूर नगरपरिषदेस या स्पर्धेतू एकूण ५ कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News