फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सावतानगरला मोफत नेत्र तपासणी शिबीर


फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सावतानगरला मोफत नेत्र तपासणी शिबीर

23 गरजूंवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

19 नागरिकांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भिंगार येथील सावतानगर मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फिजीकल डिस्टन्ससह इतर नियमांचे पालन करुन 73 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 23 गरजूंवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच या शिबीरात अवयवदान सप्ताहतंर्गत नागरिकांना अवयवदान करण्याचे आवाहन करुन यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. शिबीरार्थी 19 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.   फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात इतर रुग्णांवर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना इतर वैद्यकिय सुविधा उपलब्ध होण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. टाळेबंदीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. ही जाणीव लक्षात ठेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. तसेच मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवाने इतरांना जीवदान मिळत असेल तर यासारखे पुण्य कमविण्याचे दुसरे भाग्य नाही. एका व्यक्तीने योग्य वेळेत मरणोत्तर देहदान केल्यास त्याच्या विविध अवयवाच्या माध्यमातून 7 व्यक्तींना जीवदान मिळू शकतो. अंधश्रध्देमुळे अनेक नागरिक देहदान करण्यास पुढे येत नसून, फाऊंडेशनच्या वतीने अवयवदानसाठी जनजागृती सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रतपासणी बरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे मधुमेह व रक्तदाबाची तपासणी देखील करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल राहिंज, गौरव बोरुडे, मोहन कुर्हे, बालाजी चौधरी, शिवा खरपुडे, सौरभ बोरुडे आदिंसह फिनिक्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News