शेवगाव पावसामुळे कापूस सोयाबीन व मूगाचे पीक धोक्यात बाईजाबाई बटुळे शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण


शेवगाव पावसामुळे कापूस सोयाबीन व मूगाचे पीक धोक्यात बाईजाबाई बटुळे शेवगाव प्रतिनिधी  सज्जाद पठाण

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेवगावभ तालुक्यातील कापूस मूग सोयाबीन ही पिके धोक्यात आली असून मुगाचे पिक पिवळे पडले असून त्याला शेंगा भरल्या सुद्धा नाहीत ज्या ठिकाणी शेंगा भरल्या त्या सततच्या पावसामुळे झाडाला अंकुर फुढून खराब झाल्या  तसेच सततच्या पावसाने कापूस पिवळा पडून कापसाच्या मुळ्या खराब झाल्या आहेत सोयाबीन या पिकाची नुसती वाढ झाल्यामुळे शेंगा भरल्या नाहीत त्यामुळे तातडीने या तीनही पिकांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी शेवगाव तहसिलदार कार्यालय येथे स्वाभिमानी महिला तालुकाध्यक्ष बाईजाबाई बटुळे यांनी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, हिराबाई घोडके, आरती बडे अनेक महिला उपस्थित होत्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News