विठ्ठल होले पुणे
इंदापूर प्रतिनिधी -- इंदापूर पोलिस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टर नंबर ८५/२०२० crpc १७४ मधील अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील आहे,सदर व्यक्ती दिनांक २४/०८/२०२० रोजी ०६:०० वाजता *मौजे इंदापूर*, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे गावच्या हद्दीत *इंदापूर बस स्टॅन्डसमोरील मोकळ्या मैदानात* मयत अवस्थेत मिळून आले आहे.
सदर अनोळखी मयत इसम हा रंगाने निमगोरा, अंगाने जाडजुड, डोकीस काळे केस असुन अंगात *गुलाबी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, वीटकरी रंगाची फुल पॅन्ट व आतमध्ये नेसणीस विटकरी रंगाची अंडरवेअर* आहे.
*मयताचे गळ्यामध्ये सहापदरी पांढरा रंगाचा दोरा ( जान्हवे ) आहे.*
सदर अनोळखी मयताबाबत अगर मयताचे नातेवाईक यांचेबाबत आपणास माहिती मिळाल्यास इंदापूर पोलिस स्टेशन येथे खालील नंबर वर संपर्क साधावा.इंदापूर पोलीस स्टेशन- *०२१११/२२३३३३*
तपासणी अंमलदार-
पो.ना.पालके *८८०५४१३१००* असे आवाहन करण्यात आले आहे.