फुले शाहु आंबेडकर यांच्या आदर्शाने वात्सल्य संस्थेने समाजकार्य करावे-रघुनाथ ढोक


फुले शाहु आंबेडकर यांच्या आदर्शाने वात्सल्य संस्थेने समाजकार्य करावे-रघुनाथ ढोक

वात्सल्य निवासी मतीमंद संस्थेला फुले एज्युकेशनने 10 कॉट , गादयांची मदत केली

पुणे:-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे देहू येलवाडी रोड येथील वात्सल्य शिक्षण संस्थेचे मतिमंद निवासी शाळेला 10 कॉट, 10 गादया व 5 टेबल व इतर साहित्य 35हजार रुपयांचे दि.23.ऑगस्ट 2020 रोजी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक, आशा ढोक,आकाश ढोक व क्षितिज ढोक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने वात्सल्य संस्थेचे संस्थापक विलास देवतारसे यांचे कडे भेट दिले.

यावेळी जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा,सौ.सुशीलाबेन  शहा ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे ,मनोज शहा ,आकाश ढोक उपस्थित होते. याप्रसंगी वात्सल्य संस्थेला  सौ.सुशीलाबेन शहा यांचे वाढदिवसानिमित पाच हजार रुपयांचे धनादेश दिला तर प्रा.सुदाम धाडगे यांनी संस्थेचे कार्य पाहून पाच हजार रुपयांचे धनादेश  देण्याचे जाहीर केले. तसेच रघुनाथ ढोक यांनी मोतीलाल शहा यांचे हस्ते विलास देवतारसे यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व सावित्रीबाई फुले व इतर महापुरुषांचे रंगीत छायाचित्रे असलेले ग्रंथ संच  ग्रंथालयास भेट दिले.

यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की वात्सल्य संस्थेने 2,3 वर्षात प्रगती करून 22 मुले 14 ते 45 वया पर्यन्तचे सांभाळत आहेत हे चांगले कार्य आहे.ढोक पुढे असेही म्हणाले की ज्या प्रमाणे फुले दांपत्यानी समाजसेवा केली त्या प्रमाणेच आपणही सेवाभावी कार्य करा आमची संस्था आपल्या पाठीशी राहून मदत करेलच सोबत इतरांची ही मदत मिळवून देईल.फहक्त फुले शाहु आंबेडकर या महापुरुषांचे आदर्शाने समाजकार्य करा काही कमी पडणार नाही.मोतीलाल शहा म्हणाले की मुलांची योग्य काळजी घेऊन पुढील 2,3 महिन्यांची तयारी करावी या ठिकाणी मुले भाजीपाला पिकवत आहेत त्याबद्दल कौतुक  करून  इतरही  मौलिक मार्गदर्शन केले.

विलास यांनी प्रास्ताविक मध्ये संस्थेच्या कार्याविषयी माहिती देऊन दानशूर व्यक्तींनी या कार्यासाठी समक्ष कार्य पाहून मदत करावी असे आव्हान करून सर्व मान्यवरांचे गुलाब फुल देऊन स्वागत केले तर सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाऊन सर्व मुलांना फळ वाटप केले तर मोलाचे सहकार्य व आभार प्रदर्शन क्षितिज ढोक यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News