वीरराजे मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर


वीरराजे मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर

रक्तदान उपक्रमांचा आदर्श घेऊन प्रशासनास सहकार्य करावे

- पो.नि.प्रविण लोखंडे

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) आज कोरोनाने जगभर अस्थिर परिस्थिती निर्माण केली आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत आहे. नगरमध्येही रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती सुधारत आहे. या परिस्थिती व लॉकडाऊच्या काळातही   शासनास अनेक मंडळे, संस्था, प्रतिष्ठानने सहकार्य करुन सामजिक दायित्व जपले आहे. शासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. त्यास नगरमधील मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वीरराजे मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सव काळात रक्तदानासारखा उपक्रम हाती घेऊन चांगले योगदान दिले आहे. अशा उपक्रमांचा आदर्श इतरांनी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोतवाली पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रविण लोखंडे यांनी केले. वीर राजे मित्र मंडळाच्यावतीने (गणपतीची तालिम) गणेशोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीराचे उद्घाटन कोतवालीचे पो.नि.प्रविण लोखंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, पुजारी संगमनाथ महाराज, बाळासाहेब खामकर, सचिन गोरे, अ‍ॅड.महेश तवले आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, शासनाच्या आदेशाने लॉकडाऊनपासून सर्व मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे ते योग्यच आहे. गणेशोत्सवही सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याचा मंडळांचा निर्णयही योग्यच आहे. परंतु या काळातही आपण सामाजिक कार्य सुरु ठेवले पाहिजे, या भावनेतून वीरराजे मित्र मंडळाने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन चांगला उपक्रम राबविला आहे, असे सांगितले

     मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. श्री गणेशाची स्थापन केलेली कोरोना योद्धे पोलिसरुपी  कोरोना मूर्ती रुपातील आहे. या रक्तदान संकलनाचे कार्य जिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले. या शिबीरात अनेकांनी रक्तदान केले. मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News