संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव येथील साई सेवा भक्त मंडळाच्या वतीने कोपरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या नागरिकांसाठी गरम पाण्याचे मशीन सेवा भक्त मंडळाचे संजय काळे व संजय जगताप यांच्या वतीने देण्यात आले.
या वेळी कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसौंदर आधी उपस्थित होते. या उपक्रमा बद्दल शहरातील नागरीकांनी साईभक्त सेवा मंडळाचे कौतुक केले आहे .