राजेंद्र दूनबळे, राहता प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेने देशात १८ वे, राज्यात १७ वे तर नाशिक विभागात १६ वे मानांकन मिळवल्याबद्दल आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगूले, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र जोशी, सोमनाथ आढाव, प्रताप गोसावी, विशाल निकम, समीर वर्पे, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री. आरने, अभियंता दिगंम्बर वाघ आदी उपस्थित होते.