गांडुळाचा जिवनक्रम व खताचे फायदे !! बांधावरची शेतीशाळा सदरात.


गांडुळाचा जिवनक्रम व खताचे फायदे !! बांधावरची शेतीशाळा सदरात.

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                🌻 बांधावरची शेतीशाळा🌻

नमस्कार मित्रांनो,

मागील भागात आपण गांडुळ शेतकऱ्याचा मित्र कसा याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली.

आजच्या भागात गांडुळाचा जिवनक्रम तसेच गांडुळ खताचे फायदे या बद्दलची माहीती घेणार आहोत.

मित्रांनो गांडुळाचे आणखी काही महत्वाचे उपयोग आहेत.ते पाहिले म्हणजे गांडुळाला वगळून शेती करणे हा किती मोठा अपराध आहे आणि हा अपराध करून आपण आपल्याच पायावर कसा दगड मारून घेत असतो हे लक्षात येईल त्याच्या पोटात निसर्गाने ठेवलेल्या भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते.ती खतयुक्त विष्ठा मात्र पाण्यात पटकन विरघळते आणि ते विष्ठायुक्त खत पिकांच्या मुळांना शोषून घेता येते

म्हणजे ही सारी प्रक्रिया घडायला काही व लागतो् म्हणूनच आपल्या शेतातली शेणखतासारखी पिकांना ताबडतोब उपयोगी करून देणे म्हणजे गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे.हा भटारखाना म्हणजे खताचा कारखाना सुद्धा आहे._

गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते भस्त करत असते._

म्हणजे आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोेग दवाखाना म्हणून होत असतो. अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात.कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते.

कीडींमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधे मारावी लागतात. त्या औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो.

अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते. पहिला खर्च रासायनिक खतांचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि औषधांचा.

गांडूळ बिळ करून राहते आणि त्यासाठी माती उकरत राहते.त्याच्या या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातली माती वर येते आणि वरच्या थरातली माती खाली नेऊन सोडली जातेमातीची ही अदलाबदल मृदशास्त्रानुसार पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारे काम कसलाही पगार न घेता करत असते.

गांडूळ खता बद्दल महत्वाचे

आपल्या शेतात आपण पिकांना रासायनिक खते देतो.अशी तयार खते बाजारात मिळतात आणि ती पाण्यात सहज विरघळतात.त्यामुळे पिकांना ती दिली की, पाण्यात विरघळून तयार झालेले खतयुक्त पाणी झाडांची किंवा पिकांची मुळे शोषून घेतात.ही सारी प्रक्रिया एक-दोन दिवसात घडते.त्यामुळे रासायनिक खते पिकांना ताबडतोब लागू होतात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते.शेणखत किंवा गावखत यांची अवस्था अशी नसते.ती पटकन शोषून घेता येत नाहीत.                               शेतात पडलेले शेणखत, काडी-कचरा हे खत म्हणून पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नाहीत.मात्र ही खते किंवा शेतातले कोणतेही सेंद्रीय पदार्थ आधी गांडूळ खातो.

जमिनीमध्ये रासायनिक खते दिली तर गांडूळाच्या पोटामध्ये हि खते जाऊन गांडूळ मरण पावतात व त्यांची पुनरनिर्मितीची प्रक्रिया बंद होते.म्हणूनच गांडूळ जिवंत राहण्यासाठी शेणखत व इतर जैविक खते किंवा सेंद्रिय खते गरजेची आहेत.

 गांडूळाचा जीवनक्रम -गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असतेत्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सेंमी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात. आजच्या भागात आपण गांडुळाचा जिवनक्रम तसेच खताचे फायदे बघीतले आहेत पुढच्या भागात आपण गांडुळचे संवर्धन तसेच गांडुळ खत निर्मिती या विषयीची माहीती घेणार आहोत.

 सहकार्य -निलेश बिबवे शेतीशाळा प्रशिक्षक,कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग कोपरगाव*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News