कोपरगावात एक गाव एक गणपती !!


कोपरगावात एक गाव एक गणपती !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता कोपरगाव प्रशासनाच्या वतीने एक गाव एक गणपती स्थापना करण्याचे आव्हान सर्व गणेश मंडळांना केले होते त्याच अनुषंगाने सर्वांच्या एकमताने आज शहरात एक गाव एक गणपती ची स्थापना कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या शुभहस्ते सपत्नीक कोपरगाव चे आराध्य दैवत श्री विघ्नेश्वराचे दर्शन घेत विधिवत पूजा करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

  या वेळी तहसीलदार यांनी सांगितले की कोपरगाव च्या इतिहासात प्रथमच एक गाव एक गणपती चे आयोजन करण्यात येत असून कोपरगाव प्रशासनाने वाढत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती स्थापना करण्याच्या दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आज श्री गणेशाची सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत सर्वांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात येत आहे त्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

   या वेळी नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी सांगितले की येथून पुढे १० दिवस श्री गणेशाच्या पूजा आरतीचा मान कोरोनाचा काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, समाजसेवक या कोरोना योध्याचा शुभहस्ते दररोज सकाळी १०.३० व संध्याकाळी ६ वाजता करण्यात येईल.

    कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी व शहर पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी शहरातील सर्व गणेश मंडळाचे आभार व्यक्त करत सर्वाना गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी उपमुख्याधिकारी गोर्डे, नगरसेवक कालू आव्हाड, शिवसेनेचे कैलास जाधव, भाजपचे विनोद राक्षे, गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, शिवसेना शहराध्यक्ष सनी वाघ आदी सर्व पक्षीय राजकीय कार्यकर्ते, कोपरगाव नगरपालिका, तहसिल विभाग, पोलिस प्रशासनाचे अधिकारी, विविध गणेश मंडळाचे सदस्य व गणेश भक्त उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News