श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी १८ पॉझिटिव्ह.


श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी १८ पॉझिटिव्ह.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२२: श्रीगोंदा येथे शनिवार दि.२२ रोजी ६५ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात १८ जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. एकूण रुग्णांची संख्या ६३७ वर पोहोचली आहे. शनिवारी १४ जण बरे होऊन घरी परतले.एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४४ झाली आहे.तर आत्तापर्यंत १९ रुग्णांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीतीला ५२ संक्रमित रुग्ण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.

           दि.२२ रोजी श्रीगोंदा शहरात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शनीचौक-३, नक्षत्र लॉन्स परिसर -१, गुळवे कॉलेज परिसरात -१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडला. ग्रामीण भागात बेलवंडी बुद्रुक-३, ढवळगाव-३, काष्टी-३, पेडगाव-१,रायगव्हाण-१ तर मढेवडगावत १ रुग्ण संक्रमित सापडले. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News