गणपती बाप्पांच्या आशिर्वादाने संकटांना निर्भयपणे आणि एकीने सामोरो जावू या !! सुशांत घोडके


गणपती बाप्पांच्या आशिर्वादाने संकटांना निर्भयपणे आणि एकीने सामोरो जावू या !! सुशांत घोडके

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता दैवत असून त्याच्याच आशिर्वादाच्या बळावर भारत राष्ट्रासह विश्वावर कोरोना सह विविध संकटांना धैर्याने आणि एकजुटीने सामोरे जावूया असे आवाहन भारत सरकारचे स्वच्छतादूत व कोविड योध्दा सुशांत घोडके यांनी केले.

कोपरगांवचे ग्रामदैवत श्री गोकर्ण मंदिर गणपत चावडी येथे श्री गणेश चतुर्थी निमित्ताने प्रथम विधीवत पुजन व आरती भारत सरकारचे स्वच्छतादूत व कोविड योध्दा सुशांत घोडके,गणेशभक्त बबलू वाणी यांचे शुभहस्ते करण्यात आले.अतिप्राचीन कालखंडापासून कोपरगांवचे ग्रामदैवत गोकर्ण गणेश २५० वर्षापासून प्रचलित आहे.श्री साईबाबा जुनीमामलेदार कचेरी येथे येत असतांना येथे दर्शनासाठी थांबत.म्हणून हे ठिकाण आजही गणपत चावडी म्हणून ओळखले जाते.कै.श्रीराम बळवंत महाजन यांचे पणजोबा आबाजी महाजन हे चिंचवडच्या गणपतीचे भक्त होते.त्यांना येथे गणपतीने दृष्टांत देवून प्रकटरुप धारण केले आहे.गणेश मुर्तीच्या माथ्यावर शिवलिंग कोरलेले असून कानाचा आकार हा गोकर्ण फुलाच्या आकाराचा असल्याने गोकर्ण गणेश नावाने प्रचलित आहे. ज्य गुप्तवार्ता विभागाचे सेवानिवृत्त अप्पर उपायुक्त सुभाष महाजन हे या देवस्थानचे अध्यक्ष आहे.तर विजय जोशी कार्यवाहक आहेत. श्री गणेश चतुर्थी निमित्ताने पौरोहित्य मुकुंद कालकुंद्री यांनी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News