नागरी सुविधांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गुरुवारी बोल्हेगाव चौकात पालथा पाणी हंडा तिरडी आंदोलन.. महिला करणार आंदोलनाचे प्रतिनिधित्व


नागरी सुविधांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी  गुरुवारी बोल्हेगाव चौकात पालथा पाणी हंडा तिरडी आंदोलन.. महिला करणार आंदोलनाचे प्रतिनिधित्व

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने बोल्हेगाव येथील पोलीस कॉलनीमधील पाणी, रस्ते, गटारी आदि नागरी सुविधांचा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी गुरुवार दि.27 ऑगस्ट रोजी पालथा पाणी हंडा तिरडी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अशोक सब्बन यांनी दिली.

नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव चौकात हे आक्रोश आंदोलन होणार असून, चार महिला रिकाम्या हंड्याची तिरडी खांद्यावर घेऊन निष्क्रीय मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात कोरोना वॉरियर म्हणून पोलीस आपली सेवा देत आहे. मात्र बोल्हेगावच्या पोलीस कॉलनीतील त्यांच्या घरात प्यायला पाणी तर घरा पर्यंत जायला रस्ते देखील नाहीत. परिसरात ड्रेनेजलाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोजक्या महिलांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होणार असून, इतर आंदोलक वेबीनारच्या माध्यमातून आंदोलनात सहभाग नोंदवणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आशा नेटके, शितल जाधव, पौर्णिमा वाणी, मंदाकिनी कांबळे या करणार आहेत. या आंदोलनासाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, दादासाहेब नेटके, संतोष जाधव, वसंत जाधव, सौज्ञावती राजगुरु, उदयसिंग वाणी, अनिकेत चव्हाण आदी प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News