कोरोना संकटकाळात योगदान दिल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान


कोरोना संकटकाळात योगदान दिल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना आधार देऊन पोलीस दलासमवेत केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते भैय्या बॉक्सर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रविण लोखंडे उपस्थित होते.

देशासह महाराष्ट्रात उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी व हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या टाळेबंदीत हातावर पोट असणारे, शहरात अडकलेले परप्रांतीय, आर्थिक दुर्बलघटक व सर्वसामान्य नागरिकांचे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत या घटकांना आधार देण्यासाठी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने त्यांना अन्न-धान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पशु-पक्ष्यांची देखील खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती. तसेच कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांसाठी दररोज चहा व नाष्टयाची सोय देखील करण्यात आली होती. फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम तीन ते चार महिन्यापासून टाळेबंदी काळात अहोरात्र सुरु होता. या कार्याची दखल घेत पोलीस दलाच्या वतीने हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना आधार देत हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम राबविल्याबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा पोलीस दलाच्या वतीने सन्मान करताना पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके समवेत कोतवालीचे पो.नि. प्रविण लोखंडे. (छाया-वाजिद शेख-नगर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News