शरद पवार तरुणाईत ऊर्जा निर्माण करतात - युवाव्याख्याते शुभम खळदकर


शरद पवार तरुणाईत ऊर्जा निर्माण करतात - युवाव्याख्याते शुभम खळदकर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) 

 आजची तरुणाई धाडसी पराक्रमी व आक्रमक आहे.. स्वतःला प्रगत समजून समाजात वावरत असते पण ही तरुणाई तेवढेच मागासलेली ही आहे . आजच्या तरुणाईला धुंदी व नशा जास्त प्रिय आहे. सध्याची पिढी चे पटत नाही, त्यावर आक्रमक भूमिका घेते. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास "स्त्रीवरील अत्याचार". आजची पिढीही अनेक गोष्टींचे अनुकरण करते पण ते पाश्चात्य संस्कृतीचे.... तुम्हाला प्रिय असेल त्या गोष्टीचे अनुकरण नक्कीच करा. आपल्याला आकर्षण असते दारूचे , सिगरेटचे आणि नशा निर्माण करणाऱ्या बऱ्याच  काही पदार्थांचे. तरुणही फॅशन म्हणून व्यसनांच्या आहारी जात आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. भारतातील तरुणांनी स्वतःच्या नॉलेज आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला तर आपण निश्चितच प्रगतीपथावर पोहोचू यात काही शंका नाही. वयाच्या ऐंशीव्या वर्षी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एवढा दमदार काम करत आहेत  हे सर्व युवा वर्गास लाजिरवाणी गोष्ट आहे.शरद पवार आजच्या युवा पिढीला उर्जा निर्माण करणारे आहेत. व्यसनांच्या आहारी जाऊन आपले आपले बहुमूल्य आयुष्य न संपवता भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी योगदान दिल्यास अधिक चांगले होईल, जेणेकरून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम त्यांनी पाहिलेले व्हिजन आजचे युवा पिढी सत्यात आणू शकेल

जाहिरात
Search
विडिओ
Recent News